Sharad Pawar Resigns: शरद पवार आज काय निर्णय घेणार? वायबी सेंटरकडे रवाना, घडामोडींना वेग

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि नेत्यांनी पवारांना साकडं घालत अध्यक्षपद न सोडण्याचा हट्ट धरला आहे.
Sharad Pawar News
Sharad Pawar Newsesakal
Updated on

मुंबई : राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्षपद सोडल्याची अचानक घोषणा केल्यानंतर राज्यभरात काल खळबळ माजली होती. यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तसेच पहिल्या फळीतील नेत्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांना आपला निर्णय मागे घेण्याची गळ घातली. पण पवार अद्यापही आपल्या निर्णयावर ठाम आहेत. आज पुन्हा याबाबत घडामोडींनी वेग घेतला असून शरद पवार सिल्व्हर ओकवरुन यशवंतराव चव्हाण सेंटरकडं (वायबी सेंटर) रवाना झाले आहेत. (Sharad Pawar Resigns What will he decide today speed things up Pawar)

Sharad Pawar News
Rahul Gandhi : राहुल गांधींना दिलासा देण्यास गुजरात हायकोर्टाचा नकार; 'त्या' याचिकेवर निकाल ठेवला राखून

वाय बी सेंटरमध्ये राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीतील नेत्यांची बैठक सुरु झाली असून या बैठकीला स्वतः शरद पवार देखील हजेरी लावणार आहेत, असं सांगितलं जाच आहे. या बैठकीत देशभरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या आणि नेत्यांची भावना लक्षात घेता शरद पवारांनी राजीनामा मागे घेत पुन्हा पक्षाची धुरा सांभाळावी यावर चर्चा होणार आहे.

Sharad Pawar News
Sharad Pawar Resigns : शरद पवारांनी राष्ट्रवादीचं अध्यक्षपद सोडलं; देवेंद्र फडणवीस म्हणाले की…

दुसरीकडं वायीबी चव्हाण सेंटला मेहबूब शेख यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांच्या समर्थनार्थ आंदोलन सुरु केलं आहे. या ठिकाणी शरद पवारांच्या नावानं घोषणा दिल्या जात आहे. तर दुसरीकडं राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे हे देवगिरी बंगल्यावर अजित पवारांच्या भेटीसाठी गेले आहेत. एकूणच शरद पवारांच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये बैठकांचा सिलसिला सुरु झाला आहे.

Sharad Pawar News
Rashtrawadi Congress Party: 'या' तीन नेत्यांनी मिळून केली होती राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना; नंतर मात्र पवारांचंच एकहाती वर्चस्व

दरम्यान, शरद पवार दुपारी एक वाजेपर्यंत कार्यकर्त्यांना भेटणार आहेत. तसेच त्यांचा नेहमीचा कार्यक्रम सुरुच राहणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()