Maharashtra Politics: अजित पवारांपेक्षा 'या' व्यक्तीच्या निर्णयाने शरद पवार दु:खी

NCP crisis: राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे संकटमोचक म्हणून मानल्या जाते. शरद पवारांचे ते निरटवर्तीय समजले जातात. प्रफुल्ल पटेल यांनी राजकारणातील कोणताही निर्णय पवारांच्या सहमतीशिवाय घेतला नाही, असेही समजले जाते.
 Sharad Pawar News
Sharad Pawar NewsEsakal
Updated on

Maharashtra Politics: राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात मोठी फूट पडली आहे, यात मुख्य भूमिका महाराष्ट्र राज्याचे नवे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आहे. हा घटनाक्रम शरद पवारांवर दुहेरी हल्ला मानला जातोय. एका बाजूला त्यांना पुतण्याकडून बंडाचा सामना करावा लागला, तर दुसऱ्या बाजूला त्यांचे निकटवर्तीय समजले जाणारे प्रफुल्ल पटेल हे देखील त्यांच्या विरुद्ध जाताना दिसले.

संकटमोचकानेच वाढवली चिंता

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल हे शरद पवार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे संकटमोचक मानले जातात. राजकारमात पटेल यांनी पवारांच्या सल्ल्याशिवाय कोणताही निर्णय घेतला नाही, असेही समजले जाते. अशातच हा बंड पवारांवर वैयक्तिक हल्ला देखील ठरु शकतो. यावर शरद पवारांनी देखील वक्तव्य केले होते. ते म्हणाले की, "मी प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांच्या व्यतिरिक्त कोणावरही दु:खी नाही."

 Sharad Pawar News
Satara NCP : अजित पवारांच्या बंडानंतर बालेकिल्ल्यातच राष्ट्रवादीत उभी फूट; 'या' आमदारांनी दिली दादांना साथ!

प्रफुल्ल पटेल यांची पक्षातील भूमिका

प्रफुल्ल पटेल यांना राजकारणात आणण्यात शरद पवारांचा हात आहे, असे मानले जाते. त्यादरम्यान त्यांनी गोंदिया नगरपरिषदेच्या अध्यक्षपदापासून केंद्रीय मंत्रिपदापर्यंतचा प्रवास केला. १९९१मध्ये त्यांनी पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक जिंकली. जेव्हा त्यांना लोकसभेच्या निवडणूकीत पराभव स्वीकारावा लागला, त्यावेळी देखील पवारांचे लक्ष पटेलांना राज्यसभेत पाठवण्यावर होते.

पवारांचे संकटमोचक

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये प्रफुल्ल पटेल यांना महत्वाचे स्थान आहे. १९९९मध्ये त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष स्थापना, लोकसभा आणि विधान सभेच्या जागावाटपामध्ये महत्वाची भूमिका बजावली. तसेच गांधी कुटुंब आणि दिवंगत नेते अहमद पटेल यांच्याशी असणाऱ्या चांगल्या संबंधांमुळे महाविकास आघाडी बनवण्यात त्यांना प्रमुख खेळाडू मानले जाते.

शरद पवारांच्या राजीनाम्याचे ताजे उदाहरण आहे. तेव्हा पटेल यांनीच पक्षातील वाद शांत केला होता. पटेलांनी मनधरणी केल्यावरचं शरद पवारांनी राजीनामा मागे घेतला, असेही म्हटले जाते.

 Sharad Pawar News
Colors KKK 13 : खतरो के खिलाडी 13 च्या सेटवर शिव ठाकरे गंभीर जखमी, हाताला टाके, बघा काय घडलं

कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल

१० जूनला पवारांना मोठी घोषणा केली होती. ज्यामध्ये त्यांनी सुप्रिया सुळेंबरोबर प्रफुल्ल पटेल यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष बनवले होते. मानल्या जात होते की, या घोषणेमुळे अजित पवार यांना मोठा झटका बसला होता. काही राजकीय जाणकारांच्या मते या घोषणेमुळे २ जुलैच्या बंडाची ठिणगी पडली.

 Sharad Pawar News
Ajit Pawar: 'अजित पवार हे उपमुख्यमंत्री पदासाठी गेले नाहीत तर...', ठाकरे गटाचा दावा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.