Sharad Pawar Video : "८४ होवो, ९० होवो हे म्हातारं काही थांबत नाही"; शरद पवारांचा सत्ताधाऱ्यांना इशारा

Sharad Pawar Video : येत्या काही दिवसात राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर केल्या जाण्याची शक्यता आहे. यादरम्यान राज्यात राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे.
Sharad pawar
Sharad Pawaresakal
Updated on

येत्या काही दिवसात राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर केल्या जाण्याची शक्यता आहे. यादरम्यान राज्यात राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे संपूर्ण ताकदीनिशी निवडीणुकीच्या मैदानात उतरल्याचे पाहायला मिळत आहे. फलटणमधील सभेत शरद पवारांनी वय कितीही झाले तरी आपण थांबणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

शरद पवार नेमकं काय म्हणाले?

काही तरूण मुले माझा बोर्ड घेऊन उभे होते. त्यावर माझा फोटो होता आणि त्यावर लिहिलं होतं ८४ वर्षांचा म्हातारा. तुम्ही काळजी करू नका, अजून लांब बघायचंय... ८४ होवो, ९० होवो हे म्हतारं काही थांबत नाही. हे म्हातारं महाराष्ट्राला योग्य रस्त्यावर आणल्याशिवाय स्वस्थ बसत नाही. तुम्ही याची काळजी करू नका. या सगळ्या कामाला तुम्हा सगळ्यांची मदत अंतःकरणापासून होईल. याची खात्री मी बाळगतो, असेही शरद पवार यावेळी म्हणाले.

आज फलटण येथे संजीवराजे नाईक निंबाळकर आणि आमदार दीपक चव्हाण यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी सभेत बोलताना शरद पवारांनी सत्ताधारी पक्षांना इशारा दिला आहे.

Sharad pawar
Bahraich violence : मिरवणुकीतील डीजेच्या आवाजावरून वाद पेटला अन्.... बहराईचमध्ये हिंसाचाराचा भडका; नेमकं काय झालं?

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापू लागल्याचे दिसून येत आहे. उमेदवारी मिळवण्यासाठी वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली असून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटप अंतिम टप्प्यात आल्याचे सांगितले जात आहे.

Sharad pawar
Apple: ॲपलचा मेगा प्लॅन; आता पुण्यात तयार होणार कंपनीचे AirPods, काय फायदा होणार?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.