'आता वेळ आमची'; पवारांच्या भेटीनंतर राऊतांचा आत्मविश्वास वाढला

शिवसेनेचं बंड आता शरद पवार हाताळणार आहेत.
Sanjay Raut on MVA Government
Sanjay Raut on MVA Governmentesakal
Updated on

शिवसेना नेते एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर आता महाविकास आघाडी सरकारला थेट धक्का पोहोचलेला आहे. तिन्ही पक्षांच्या बैठका जोर धरू लागल्या आहेत. अशातच महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची तयारी दाखवणारे संजय राऊत यांचा आत्मविश्वास मात्र वाढलेला दिसत आहे. याचं कारण ठरलंय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट. (Sanjay Raut on MVA Government and sharad pawar eknath shinde)

Sanjay Raut on MVA Government
महाविकास आघाडी सरकार बहुमत सिद्ध करेल, शरद पवारांना विश्वास

शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी आज यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 'हम हार मानने वाले नहीं, हम जितेंगे', असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला आहे. संजय राऊत म्हणाले की, ज्यांना आमचा सामना करायचाय त्यांनी थेट मुंबईत यावं. आमदारांनी हे खूप चुकीचं पाऊल उचललं आहे. आम्ही त्यांना संधीसुद्धा दिली होती, परत येण्याची. पण आता वेळ गेलीय. आता आमची वेळ आली आहे. आम्ही शरद पवारांची भेट घेतलीय. आम्ही आता तयार आहोत. तुम्ही आता मुंबईत या. आमचं आव्हान आहे तुम्हाला, मुंबईत या.

Sanjay Raut on MVA Government
शरद पवार ठाकरेंच्या भेटीला 'वर्षा'वर; सरकार वाचणार की...

राऊत पुढे म्हणाले की, महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi Government) याच इमारतीमधून सुरू झाली होती. याच इमारतीत उभं राहून मी सांगतो की, महाविकास आघाडी सरकार मजबूत आहे. ते पुढची अडीच वर्षे तर पूर्ण करेलच. पण त्यानंतर पुन्हा सत्तेत येईल. संजय राऊतांसोबतच्या या भेटीनंतर आता शिवसेनेचं हे ऐतिहासिक बंड शरद पवार हाताळणार हे स्पष्ट झालं आहे.

Sanjay Raut on MVA Government
अजित पवारांना गुजरात, आसाममधील स्थिती माहिती नसेल - पवार

काल झालेल्या पत्रकार परिषदेतही शरद पवारांनी याचे संकेत दिले होते. मुंबईत परत या, असं आवाहन त्यांनी केलं होतं. तसंच महाविकास आघाडी बहुमत सिद्ध करणारच असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.