राष्ट्रवादीवर जातीयवादाचा आरोप करणाऱ्या राज ठाकरेंना पवारांचं प्रत्युत्तर

पाडवा मेळावा आणि उत्तर सभेत राज ठाकरेंनी राष्ट्रवादीवर जातीयवादी पक्ष असल्याचा आरोप केला होता.
Sharad Pawar Replied Raj Thackeray
Sharad Pawar Replied Raj Thackeraye sakal
Updated on

मुंबई : शिवाजी पार्कमधील पाडवा मेळावा आणि त्यानंतर ठाण्यातील उत्तर सभेत राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जातीयवादी पक्ष असल्याचा आरोप केला होता. या आरोपाला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन चोख उत्तर दिलं. (Sharad Pawar sharp reply to Raj Thackeray on accusing of NCP is casteism Party)

शरद पवार म्हणाले, "एखाद-दुसरी व्यक्ती वर्ष सहा महिन्यात एखादं स्टेटमेंट करुन आपलं मत व्यक्त करते, हे फार गांभीर्यानं घेण्यासारखं नसतं. पण राष्ट्रवादी काँग्रेस एक असा पक्ष आहे ज्या पक्षाचं नेतृत्व सुरुवातीला छगन भुजबळ यांच्या हातात होतं. तसेच राष्ट्रवादीचे पक्षनेते मधुकर पिचड होते जे आदिवासी समाजाचे नेते होते. त्यानंतर पक्षाच्या नेतृत्वाची जबाबदारी धनंजय मुंडेकडे होती, जे ओबीसींचं नेतृत्व करतात. ज्या पक्षाच्या जबाबदारीच्या पदांवर अशा प्रकारचे लोक नेतृत्व करतात अशा पक्षाला जातीयवादी ठरवणं यावर काही उत्तर देण्याची गरज मला वाटत नाही"

उत्तर सभेत राज ठाकरे काय म्हणाले होते?

ठाण्यातील उत्तर सभेत राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर पुन्हा एकदा जातीयवादाचा आरोप करताना राष्ट्रवादीच्या उदयानंतरच राज्यात जातीयवाद वाढला असा आरोप केला होता. तसेच राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शऱद पवार यांच्यावर वैयक्तिक हल्ला करताना ते नास्तिक असून देवाला मानतं नाहीत. त्यामुळं कुठल्याही मंदिरांमध्ये जात नाहीत, त्यामुळं त्यांना मशिदींवरील भोग्यांबाबत काही वाटतं नाही. तसेच पवार हे आपल्या भाषणांमध्ये फुले-शाहू-आंबेडकर यांचं नाव घेतात पण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत नाहीत, कारण त्यांना मुस्लिमांचं समर्थन मिळणार नाही, असाही आरोप राज ठाकरे यांनी केला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()