Sharad Pawar: "शरद पवारांनी अभ्यास करून बोलावे"

पालकमंत्री विखे-पाटील यांचं पत्रकार परिषदेतून टीकास्त्र
Sharad Pawar Nagaland
Sharad Pawar Nagalandesakal
Updated on

शरद पवार हे माजी केंद्रीय कृषी मंत्री राहिले आहे. त्यांनी कोणतेही विधान करताना वस्तुस्थितीची माहिती घेऊन अभ्यास करत विधान करावे, अशी टीका राज्याचे पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सोलापुरात केली. शरद पवार यांनी दुग्धजन्य प्रदार्थ आयातप्रकरणी केंद्र सरकाला लिहिलेल्या पत्रावरून पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते.

केंद्र सरकार परदेशातून तूप आणि बटर आयात करणार असल्याचे वृत्त वर्तमानपत्रांमध्ये आल्यानंतर त्या बातमीचा आधार घेऊन माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली होती. या निर्णयामुळे राज्यातील दूध उत्पादक शेतकरी आणि संकलन केंद्र अडचणीत येतील, हा निर्णय केंद्र सरकारने बदलावा, असे पत्र केंद्रसरकारला लिहले आहे आणि सोशल मीडियावर ट्विट देखिल केले आहे.

Sharad Pawar Nagaland
...त्यामुळे महिला शूर्पणखा दिसतात; केंद्रीयमंत्र्यांच्या वादग्रस्त विधानाचं महिला मंत्र्याकडून समर्थन

या संदर्भात राज्याचे पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना विचारणा केली असता, त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. शरद पवार हे केंद्राचे कृषी मंत्री राहिले आहेत. त्यांनी या प्रकरणाची माहिती घेऊन अभ्यास करून बोलले पाहिजे.

Sharad Pawar Nagaland
Devendra Fadnavis: अचानक ठरलं! उपमुख्यमंत्री भाजप मंत्र्यांसोबत अयोध्येला, दौऱ्यामागे राजकीय खेळी?

केंद्र शासनाने बटर आणि तूप आयत करण्याचा निर्णय अद्याप घेतला नाही, विचार सुरू आहे, असे सांगितले आहे. मध्यतंरी लम्पीच्या रोगामुळे दुधाच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. मात्र, यामध्ये तूप आयात करण्याचा प्रश्‍न नाही बटर देखिल कितीजण खाणारे आहेत. हा देखील प्रश्‍न आहे. तर राज्यामध्ये ७० टक्के दूध खासगी तर ३० टक्के सरकारी संस्थामध्ये संकलन केले जाते. यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. लगेच उत्पादक शेतकऱ्यांवर परिणाम होणार हे शरद पवार यांचे विधान वास्तावाला धरून नाही. केंद्र शासन असा निर्णय घेणार असेल तर राज्य शासनाच्या वतीने केंद्र सरकारला विनंती करून विचारपूर्वक निर्णय घ्यावा, अशी मागणी करणार असल्याचे सांगितले.

Sharad Pawar Nagaland
कर्नाटकात काँग्रेसला बसणार धक्का? 15 नेते जेडीएसमध्ये सामील होणार; माजी मुख्यमंत्र्यांचा दावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.