'शरद पवार पावसात भिजले, पण भाजपला न्युमोनिया झालाय'

Sharad Pawar vs Gopichand Padalkar
Sharad Pawar vs Gopichand Padalkaresakal
Updated on
Summary

'त्या' वक्तव्यावरुन राष्ट्रवादीकडून पडळकरांना सणसणीत प्रत्युत्तर देण्यात आलंय.

'शरद पवारांचं पावसातील भाषण' (Sharad Pawar) हे चार शब्द महाराष्ट्राच्या राजकारणाशी चिरपरिचित असलेल्या कोणालाही ‘ते’ भाषण आठवून देण्यास पुरेसं आहे; पण याच पावसातल्या भाषणावरून काल (शुक्रवार) भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी त्यांच्यावर टीका केलीय. 'साताऱ्यात पावसात भिजूनही तुम्हाला 54 च्या वर जाता आलं नाही आणि ती संख्या कायम ठेवण्यासाठी वारंवार 'तुम्ही घाबरु नका, काळजी करु नका' असं सांगावं लागतंय, असं पडळकर पवारांना उद्देशून म्हणालेत. त्यावर आता राष्ट्रवादीकडून (NCP) पडळकरांना सणसणीत प्रत्युत्तर देण्यात आलंय.

'शरद पवार पावसात भिजले; पण न्युमोनिया मात्र भाजपला झालाय', असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी गोपीचंद पडळकर यांना लगावलाय. पडळकर उठसूठ शरद पवार यांच्याविषयी वक्तव्य करत असतात. भाजपला महाराष्ट्रात सत्ता काबीज करता आली नाही, हे त्यांचं दुःख आम्ही समजू शकतो. साताऱ्यातील पावसाळी सभेत शरद पवारांनी जनतेला आवाहन केलं होतं आणि त्याला महाराष्ट्रातल्या तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, हे गोपीचंद पडळकर विसरले असावेत. म्हणून, ते सतत त्यांच्यावर टीका करत आहेत, अशा शब्दात तपासेंनी त्यांचा चांगलाच समाचार घेतलाय. शरद पवारांचं नाव घेतल्याशिवाय आमदार पडळकरांना प्रसिद्धी मिळत नाही हे त्यांनाही कळून चुकलंय, म्हणून ते पवारसाहेबांवर टीक करत सुटलेत, असंही ते म्हणाले.

Sharad Pawar vs Gopichand Padalkar
AIMIM ऑफरबाबत शिवसेनेच्या भूमिकेकडं भाजपचं लक्ष : देवेंद्र फडणवीस

गोपीचंद पडळकर काय म्हणाले होते?

महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून वारंवार आघाडीतील नेते असतील, शरद पवार असतील ते महाराष्ट्रातील जनतेला सांगतात की भाजप सत्तेत येणार नाही. आम्ही पुढील 25 वर्षे सत्तेत राहणार असं ते म्हणतात. मला त्या सगळ्या लोकांना सांगायचं आहे की, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे 105 आमदार निवडून आले. तर, शिवसेनेचे 56 आमदार निवडून आले. पावसात भिजून देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे 54 आमदार निवडून आले. तुम्ही पक्षाची स्थापना केल्यापासून पक्षाचा नेता मुख्यमंत्री करता आला नाही, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.

Sharad Pawar vs Gopichand Padalkar
Punjab : मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या मंत्रिमंडळानं घेतली शपथ

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार काय म्हणाले?

एकीकडं महाविकास आघाडीचं सरकार पडणार असा दावा भाजप नेते सातत्यानं करताहेत. अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजपला थेट आव्हान दिलंय. राज्यात भाजपला पुन्हा येऊ देणार नाही, अशी गर्जनाच शरद पवार यांनी केलीय. महाविकास आघाडीच्या (MVA) तरुण आमदारांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष (NCP) शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. भाजपला राज्यात येऊन देणार नाही, पण त्यांच्याकडूनही काही शिका, असा सल्ला पवारांनी यावेळी तरुण आमदारांना दिलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.