Sharad Pawar : शरद पवार धमकी प्रकरणी आरोपी सागर बर्वेला 14 जूनपर्यंत पोलीस कोठडी

Sharad Pawar
Sharad Pawar
Updated on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार धमकी प्रकरणात अटक आरोपी सागर बर्वेला मुंबईच्या महादंडाधिकारी न्यायालयाने 1 दिवसाची 14 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.मुंबई पोलिसांकडून आरोपीची 2 दिवसाची कोठडी मागण्यात आली होती. परंतु न्यायलयाने एक दिवसाची पोलीस कोठडी मंजूर केली.

Sharad Pawar
Mumbai : पावसाळ्यात विविध भागातील प्रत्येक घटनेचे अपडेट मिळणार; उपनगरात ५ हजारांवर CCTV कॅमेरे

पोलिसांनी कोठडी मागताना आरोपीच्या ताब्यातून घेतलेले मोबाईल लॅपटॉप यांतून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीची चौकशी करायची असल्याचे न्यायालयात सांगितले.तसेच या प्रकरणात इतर संशयित आरोपीचा सागर बर्वेशी काही संबंध आहे का याचा देखील तपास पोलीस करत आहेत.

आरोपीचा युक्तिवाद

ॲड. सुशीला गुप्ता यांनी आरोपी सागर बर्वेच्या वतीने न्यायालयात युक्तिवाद केला. युक्तिवाद करताना ॲड गुप्ता यांनी सागर बर्वेने ज्या सोशल मीडियावरील प्रोफाईलवरून धमकी दिली त्या सोशल मीडियावरिल प्रोफाईल डिलीट केल्याचे सांगितले. तसेच सागर विरोधात दाखल गुन्ह्यातील कलम 504 506 जामीनपात्र असल्याचे सागरच्या वकिलांनी युक्तिवादात म्हटले. पुढे सागरने तपासात सर्व माहिती दिली असून मोबाईल लॅपटॉप पोलिसांच्या ताब्यात आहे. मग पोलीस कोठडीची गरज काय असा प्रश्न करत पोलीस कोठडीला सागराच्या वकिलांनी विरोध केला.

Sharad Pawar
Mumbai-Pune Expressway : अखेर साडेपाच तासांनंतर दोन्ही बाजूंची वाहतूक सुरु; रस्त्यातून टँकर हटवला

पोलिसांकडून कोठडीची मागणी

पोलिसांकडून आरोपीची 2 दिवसाची कोठडी मागण्यात आली होती. परंतु न्यायलयाने एक दिवसाची पोलीस कोठडी मंजूर केली. पोलिसांनी कोठडी मागताना आरोपीच्या ताब्यातून घेतलेले मोबाईल लॅपटॉप यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीची चौकशी करायची असल्याचे न्यायालयात सांगितले.

तसेच या प्रकरणात इतर संशयित आरोपीचा सागर बर्वेशी काही संबंध आहे का याचा देखील तपास पोलीस करत आहेत. तसेच आरोपीवर आक्षेपार्ह टिप्पणी करून दोन समूहात किंवा समाजातील विविध संमूहात कलह निर्माण केल्याच्या आरोपामुळे तपास गरजेचे असल्याचे पोलिसांकडून न्यायालयात सांगण्यात आले.

घटनाक्रम

फेसबुक आणि ट्विटरसह सोशल मीडियावर जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केली. या संदर्भात सुळे यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेतली होती. फेसबूकपोस्टमध्ये शरद पवार यांना उद्देशून 'तुझा लवकरच दाभोलकर होणार', अशी धमकी देण्यात आली होती.

फेसबुकवर धमकी दिल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्याने शुक्रवारी लोकमान्य टिळक मार्ग पोलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास आता मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा करत होती. या तपासा दरम्यान पुण्यातून सागर बर्वेला रविवारी मुंबई पोलीसांनी अटक केली .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.