Sharad Pawar: "राज ठाकरेंचं राजकारण मॅच फिक्सिंगवर..." शरद पवारांवरील टीकेचे ठाकरेंच्या शिवसेनेकडून उत्तर

Uddhav Thackeray : "धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या माध्यमातून मुंबईची लूट होऊ देणार नाही. धारावीचा भूखंड अडानीच्या घशात घालण्यासाठी वर्षा बंगल्यावर सौदा सुरू आहे. तो सौदा आम्ही होऊ देणार नाही."
Sharad Pawar Uddhav Thackeray And Raj Thackeray
Sharad Pawar Uddhav Thackeray And Raj ThackerayEsakal
Updated on

मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांची आज सोलापूरात पत्रकार परिषद झाली. यामध्ये त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी राज्याची परिस्थिती मणिपूर सारखी होईल अशी भीती व्यक्त केली होती. याबाबत ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा ठाकरे म्हणाले की, "महाराष्ट्राचा मणिपूर होणार नाही याची काळजी शरद पवार यांनी घेतली पाहिजे असे विधान केले."

राज ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर निशाना साधला.

दिल्लीत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, "त्यांनी राजकारणत परत नव्याने सुरुवात केली आहे. ते दरवर्षी नव्याने राजकारणाची सुरुवात करतात. त्यांचं राजकारण मॅच फिक्सिंगवर सुरू असते.

पवार-शिंदे भेट

दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. धारावी प्रकल्प आणि शिंदे-पावर भेटीचा काही संबंध आहे का? असे विचारल्यावर राऊत म्हणाले की, ते तुम्ही शरद पवार यांना विचारा. ते कशासाठी भेटले हे मला सांगता येणार नाही. ते अनेक विषयांसाठी भेटले अशी माहिती आहे.

राऊत यांनी पुढे आरोप केला की, "धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या माध्यमातून मुंबईची लूट होऊ देणार नाही. धारावीचा भूखंड अडानीच्या घशात घालण्यासाठी वर्षा बंगल्यावर सौदा सुरू आहे. तो सौदा आम्ही होऊ देणार नाही. आमचं सरकार आल्यावर धारावीच टेंडर रद्द करू अस उद्धव ठाकरे यांनी सांगितल आहे. धारावीबाबत आमची भूमिका एकदम स्पष्ट आहे. धारावी लाडक्या उद्योगपतीच्या घशात घालू देणार नाही."

Sharad Pawar Uddhav Thackeray And Raj Thackeray
Omkareshwar Mandir Pune: श्रावणातील पहिल्याच सोमवारी भाविक ओंकारेश्वराच्या दर्शनाला मुकणार, अर्धे मंदिर पाण्याखाली

फडणवीस कच्चा लिंबू

यावेळी संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, "लोकसभेत चक्रव्यूव्हाची काय अवस्था झाली हे आपण पाहिलं. देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्र सिरियस घेत नाही. त्यांना जेलमधील गुन्हेगाराची मदत घ्यावी लागते त्यातूनच फडणवीस किती चक्रव्यूव्हामध्ये अडकले आहेत ते दिसतेय."

Sharad Pawar Uddhav Thackeray And Raj Thackeray
Siddhant Patil: "अथक प्रयत्न केल्यानंतरही..."; अमेरिकेत बेपत्ता झालेल्या महाराष्ट्र पुत्राचा मृत्यू, फडणवीसही गहिवरले

पुढे चांदिवाल आयोगावर बोलताना राऊत म्हणाले, "अनिल देशमुख यांनी सांगितलं तसं चंदिवाल आयोग आधी जाहीर करा मग तुरुंगातील प्रवक्त्यांन बोलायला लावा. देवेंद्र फडणवीस राजकारणातील कच्चा लिंबू आहेत. चांदिवाल आयोगाचा अहवाल कधीही सादर झाला असता म्हणून त्यांनी आमचं सरकार पाडल."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.