Video : धनंजय मुंडेंची डोकेदुखी वाढवलेले बबन गित्ते नेमके आहेत तरी कोण? पवारांचा डाव यशस्वी होईल का?

Video : धनंजय मुंडेंची डोकेदुखी वाढवलेले बबन गित्ते नेमके आहेत तरी कोण? पवारांचा डाव यशस्वी होईल का?
Updated on

बीडः गुरुवारी बीडमध्ये शरद पवार यांच्या स्वाभिमान सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी सभेचं नियोजन केलं. याच सभेत परळीतल्या एका नेत्याचं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तो नेता म्हणजे बबन गित्ते. बबन गित्ते आगामी विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडेंना जड जातील, असं बोललं जात आहे.

अजित पवारांच्या बंडानंतर आता शरद पवारांनी महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे. येवल्यात झालेल्या सभेनंतर बीडमध्ये प्रचंड मोठी सभा झाली. या सभेमध्ये परळीतील एका नेत्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश केलाय. ज्यामुळे अर्थातच धनंजय मुंडे यांची डोकेदुखी वाढेल, असं बोलले जातंय. नेमकं कोण आहेत बबन गित्ते ते पाहुया.

Video : धनंजय मुंडेंची डोकेदुखी वाढवलेले बबन गित्ते नेमके आहेत तरी कोण? पवारांचा डाव यशस्वी होईल का?
ST Bus : श्रावण महिन्यात एसटीची धार्मिक सहल, प्रत्येक जिल्ह्यात राबवणार उपक्रम; मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक

आपल्या भाषणात धनुभाऊंना अस्मान दाखविण्याची तयारी मतदारांनी केल्याचं सांगत बबन गित्तेंनी हाती घड्याळ बांधलं. बबन गित्ते यांनी राष्ट्रवादी प्रवेशावेळी मोठं शक्ती प्रदर्शन केलं. जवळपास एक हजार गाड्यांच्या ताफ्यासह बबन गित्ते सभास्थळी आले. त्यावरून गित्ते यांच्यामागे समर्थकांची मोठी गर्दी असल्याचं स्पष्ट झालं. शरद पवार यांनीही धनंजय मुंडे यांच्याविरोधातील मोहरा म्हणून गित्ते यांना ताकद देणार असल्याचं स्पष्ट केलं.

परळीत सत्तेचा गैरवापर करून लोकांना जेलमध्ये टाकण्याचे प्रकार होत आहेत. अशी सत्ता उलथवून टाकण्यासाठी लोक तयार होत असतात, असं म्हणत पवारांनी एकप्रकारे गित्ते हेच धनुभाऊंना भिडणार असल्याचं अप्रत्यक्ष सांगितलं.

Video : धनंजय मुंडेंची डोकेदुखी वाढवलेले बबन गित्ते नेमके आहेत तरी कोण? पवारांचा डाव यशस्वी होईल का?
Modi Vs Gandhi: वाराणसीतून PM मोदी विरुद्ध प्रियंका गांधी?; लोकसभेसाठी काँग्रेसच्या बड्या नेत्याचं सूचक विधान

बबनराव गित्ते कोण आहेत?

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत बबन गित्तेंनी काम केलं. मुंडेंच्या पश्चात गित्तेंनी अनुक्रमे पंकजा आणि धनुभाऊंना साथ दिली. पंकजा यांचं नेतृत्व मान्य नसतानाही केवळ मुंडे साहेबांची मुलगी म्हणून त्यांनी पंकजांना साथ दिली. मतभेद झाल्याने ते धनुभाऊंच्या सोबत गेले. धनंजय मुंडेंच्या साथीने गित्तेंनी परळीची पंचायत समिती निवडणूक लढवली आणि जिंकलीही. बबन गित्ते यांच्या पत्नी सभापती म्हणून निवडून आल्या. यामुळे त्यांच्यावर विविध आरोप झाले. धनुभाऊंच्या गटाबरोबर वाद झाल्यानंतर त्यांच्या पत्नीवर बहुमताने अविश्वास ठराव आणला गेला. तिथेच धनंजय मुंडे आणि गित्ते यांच्यात वादाची पहिली ठिणगी पडली.

एका प्रकरणात बबन गित्ते यांना जेलवारी करावी लागली. मात्र जेलमधून बाहेर येत गिंतेंनी कंबर कसली आणि विरोधकांना धडा शिकवण्याचा निर्धार केला. गित्तेंच्या एंन्ट्रीने परळीमधील वंजारी समाजाचे मतदान विभागलं जाण्याची शक्यता आहे. तर पवारांनी प्रचार केल्यास मुंडेंच्या अडचणी वाढू शकतात. त्यामुळे बबन गिंत्तेंना हलक्यात घेण्याची चूक धनंजय मुंडे करणार नाहीत, येणारी परळी विधानसभा चूरशीची होणार हे दिसून येतंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.