Sharad Pawar: "सगळ्या संकटाचं विस्मरण करुन आनंदानं कुटुंबासमवेत...."; शरद पवारांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा!

Sharad Pawar
Sharad Pawar
Updated on

Sharad Pawar: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. अजित पवार आणखी काही दिवस विश्रांती घेतील आणि पवार कुटुंबीयांच्या दिवाळीसाठी बारामतीला जाणार नसल्याचे त्यांच्या कार्यालयाने काल सांगितले होते. मात्र, शुक्रवारी त्यांनी पुण्यात शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार आणि इतर कुटुंबातील सदस्य शरद पवार यांचे बंधू प्रताराव पवार यांच्या पुण्यातील बाणेर येथील घरी जमले होते.

ही भेट आणि संवादानंतर अजित पवार थेट दिल्लीला विशेष विमानाने रवाना झाले. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दिवाळीच्या शुभेच्छांसाठी सर्वजण भेटल्याचे शरद पवार म्हणाले.

शरद पवार म्हणाले, "सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात चढ-उतार असतात, अडचणी असतात. वेळप्रसंगी काही संकटांना सुद्धा तोंड द्यावं लागतं. पण, आयुष्यामधल्या प्रतिवर्षी काही दिवस असे असतात या सगळ्या संकटाचं विस्मरण करुन आनंदानं कुटुंबासमवेत दिवस घालवावा, जगावं, अशाप्रकारची इच्छा असते आणि अशी इच्छा प्रदर्शित करण्याचा दिवस म्हणजे दीपावलीचा दिवस. संबंध महाराष्ट्रात आज, उद्या या दोन-तीन दिवसांमध्ये लोक आनंदानं, उत्साहानं हा सण साजरा करण्यासाठी काळजी घेतात, प्रयत्न करतात."

Sharad Pawar
Ananya Panday: अनन्याचा गृहप्रवेश! अभिनेत्रीनं स्वत:लाच दिलं दिवाळी गिफ्ट...

"मी महाराष्ट्रातील जनतेला दिवाळीचा सण हा आनंदाचा जावो, त्यांच्या व्यक्तिगत आणि कौटुंबिक जीवनात सह्दय येवो आणि पुढच्या आयुष्यासाठी, या वर्षासाठी जो कार्यक्रम आखला त्यात भरपूर भरपूर यश येवो, अशा  देतो. आपल्या सगळ्यांचं अभिनंदन", असे शरद पवार म्हणाले. (Latest Marathi News)

Sharad Pawar
Maratha Reservation: मराठा आरक्षणावरून जरांगे पाटील आणि तानाजी सावंतांमध्ये जुंपली!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()