Sharad Pawar : शरद पवारांच्या निर्णयानंतर ठाकरेंचा गंभीर आरोप; राजकीय वर्तुळात खळबळ

मित्र पक्ष ठाकरे गटाने थेट शरद पवारांवर गंभीर आरोप केले
Sharad Pawar Withdraw Resignation on saamana maharashtra politics
Sharad Pawar Withdraw Resignation on saamana maharashtra politics
Updated on

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जनभावनेचा आणि कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते यांचा आदर राखत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतला आहे. मात्र, राजकीय गोटात उलट सुलट चर्चा होताना दिसत आहे. अशातच मित्र पक्ष ठाकरे गटाने थेट शरद पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. (Sharad Pawar Withdraw Resignation on saamana maharashtra politics)

राजीनामा नाट्यानंतर शरद पवार यांच्यावर सामना अग्रलेखातून टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. इतकचं नव्हे तर विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका करण्यात आली आहे. वारसदार निर्माण करण्यात पवार अपयशी ठरले असा आरोप सामना अग्रलेखात करण्यात आला आहे.

Sharad Pawar Withdraw Resignation on saamana maharashtra politics
Sharad Pawar on Ajit Pawar: "अजितदादांना प्रसिद्धीची चिंता नाही" शरद पवारांनी 'त्या' चर्चांना दिला पूर्णविराम

वारसदार निर्माण करण्यात पवार अपयशी...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद सोडत असल्याची घोषणा शरद पवार यांनी करताच खळबळ माजणे साहजिकच होते. ही खळबळ देशाच्या राजकारणात माजली, त्यापेक्षा जास्त त्यांच्या पक्षात माजली. कारण शरद पवार म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष.

पवार हे राजकारणातील पुराण वटवृक्षाप्रमाणे आहेत. त्यांनी मूळ काँग्रेस पक्षातून बाहेर पडून ‘राष्ट्रवादी’ असा स्वतंत्र पक्ष स्थापन केला, चालवला व टिकवला. पण शरद पवार यांच्यानंतर पक्ष पुढे नेणारे नेतृत्व पक्षात उभे राहू शकले नाही. पक्षाचा शेंडा-बुडखा, बुंधा… सर्व काही महाराष्ट्रातच असल्याने पवारांच्या सर्वच सहकाऱ्यांना जे हवे आहे ते महाराष्ट्रातच.

Sharad Pawar Withdraw Resignation on saamana maharashtra politics
Sharad Pawar : निवृत्ती मागे घेतल्यानंतर शरद पवार रोखठोक बोलले! म्हणाले, "काँग्रेस सत्तेत येणार"

पवार हे राष्ट्रीय पातळीवर मोठे नेते नक्कीच आहेत व त्यांच्या शब्दाला राष्ट्रीय राजकारणात मान असला तरी पक्ष पुढे नेईल असा वारसदार निर्माण करण्यात ते अपयशी ठरले व त्यामुळे चारेक दिवसांपूर्वी निवृत्तीची घोषणा करताच पक्ष बुंध्यापासून हादरला व प्रत्येक जण आता आपले कसे होणार? या चिंतेने हादरून गेला.

कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी मनधरणी केली व लोकभावनेचा आदर राखून पवार यांनी राजीनामा मागे घेतला व यापुढे तेच राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा सांभाळतील. त्यामुळे गेले चार-पाच दिवस सुरू असलेल्या नाटय़ावर पडदा पडला आहे.

Sharad Pawar Withdraw Resignation on saamana maharashtra politics
Sharad Pawar: शरद पवारांचा सोलापूर दौरा राजकारणाला नवी दिशा देणारा

पवार पुन्हा आले! भाजप लॉजिंग-बोर्डिंग रिकामेच

शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा त्यांचा ‘प्लान’ होता. लोक बॅगा भरून तयारच होते व येणाऱ्यांच्या ‘लॉजिंग-बोर्डिंग’ची व्यवस्था पूर्ण झाल्याचे बोलले जात होते. मात्र शरद पवारांच्या खेळीने भाजपचा ‘प्लान’ कचऱ्याच्या टोपलीत गेला व त्यांची पोटदुखी वाढत गेली. अशा शब्दात सामना अग्रलेखातून अजित पवार यांच्यावर टीका करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.