Sharad Pawar Latest News : शरद पवारांचं CM शिंदे, फडणवीस, अजितदादांना पत्र, नेमकं काय आहे प्रकरण?

Sharad Pawar wrote a Letter to CM Shinde,Fadnavis,Ajit Pawar : शरद पवार यांच्या या पत्रामध्ये त्यांनी राज्यातील शाळा व्यवस्थापनाचा दर्जा खालावला जाणे ही महाराष्ट्राच्या गुणवत्तादायी शैक्षणिक परंपरेला गालबोट लावणारी बाब असल्याचं म्हंटलं आहे
Sharad Pawar
Sharad PawarEsakal
Updated on

Maharashtra Politics : राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्षात बंड केलं आणि शिंदे-फडणवीस यांच्यासोबत सत्तेत सामील होण्याचा निर्णय घेतला. राजकीय वर्तुळात घडामोंडीना वेग आहेत. अजित पवारांसोबत राष्ट्रवादीच्या इतर आठ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार आणि इतर नेत्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडली. राष्ट्रवादीमध्ये शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट निर्माण झाले. अशातच शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना पत्र लिहिलं आहे.(Latest Marathi News)

शरद पवार यांनी या पत्रामध्ये लिहलं आहे की, 'सक्षम शैक्षणिक व्यवस्था ही समाज सुधारण्यास कारणीभूत ठरत असते. महाराष्ट्रात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासारख्या अनेक शिक्षणमहर्षींनी हेच तत्व ओळखून सक्षम शालेय व्यवस्था उभारण्याला प्राधान्य दिले. मात्र आजच्या काळात राज्यातील शाळा व्यवस्थापनाचा दर्जा खालावला जाणे ही महाराष्ट्राच्या गुणवत्तादायी शैक्षणिक परंपरेला गालबोट लावणारी बाब आहे.' (Marathi Tajya Batmya)

Sharad Pawar
Ajit Pawar Latest Update : अजित पवारांच्या गटानं हिसकावली शिंदे-फडणवीसांची 'ही' खाती

'केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी प्रसिद्ध केलेल्या परफॉर्मेंस ग्रेडिंग इंडेक्स २.० (पी जी आय) अहवालानुसार महाराष्ट्र राज्याची दुसर्‍या स्थानावरून थेट सातव्या स्थानावर घसरण झाली आहे. राज्याच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासाच्या दृष्टीकोनातून ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. ज्या निकषांच्या आधारे हे मूल्यमापन केले जाते त्यामध्ये अध्ययन निष्पत्ती व गुणवत्ता, पायाभूत सुविधा, बदलती शैक्षणिक प्रक्रिया आदी मुद्द्यांचा समावेश होतो. परंतु परफॉर्मेंस ग्रेडिंग इंडेक्स २.0 (पी जी आय) अहवालानुसार महाराष्ट्रात या महत्वपूर्ण घटकांना गांभीर्याने घेतले गेल्याचे दिसून येत नाही' अशी खंत पत्रात व्यक्त केली आहे.(Latest Marathi News)

Sharad Pawar
Balasaheb Thorat News : 'पवार महाराष्ट्रात फक्त हात जोडून जरी फिरले तरी राष्ट्रवादी उभी राहिल'

त्याचबरोबर 'राज्य म्हणून शैक्षणिक गुणवत्तेत खूपच मागे पडलो आहोत, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. यशवंतराव चव्हाण सेंटरच्या शिक्षण विभागाने, मागील वर्षी ‘दोन शिक्षकी शाळांचे सक्षमीकरण’ या विषयावर एक दिवसाची परिषद घेऊन काही निरीक्षणे नोंदविली होती. यासोबतच बदलत्या शैक्षणिक धोरणांच्या दृष्टीकोनातून काही सूचना देखील केल्या होत्या. राज्यात जिल्हा परिषदेच्या जवळपास ३८ हजार दोन शिक्षकी शाळा आहेत. त्या प्रामुख्याने वाड्या-वस्त्यांवर असून विद्यार्थी पट संख्या कमी असल्याने त्या बंद करण्याची चर्चा अधून-मधून होत असते, शासनाने त्याची गंभीर दाखल घेणे अतिशय गरजेचे आहे' असल्याचं शरद पवारांनी म्हंटलं आहे. (Marathi Tajya Batmya)

Sharad Pawar
Ajit Pawar Portfolio : अखेर शिक्कामोर्तब! अजित पवारांकडे अर्थ खातं, वळसेंकडेही मोठी जबाबदारी; लवकरच घोषणा

तर, 'खालावत जाणारा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी वेळीच उपाययोजना करायला हव्यात. या सर्व बाबींचा विचार करता राज्य शासन आणि विशेषतः शालेय शिक्षण मंत्र्यांनी याचा गांभीर्याने विचार करावा. याबाबत सर्व संबंधितांची लवकरात लवकर बैठक बोलावून आवश्यक कृती कार्यक्रम तयार करावा. शैक्षणिक गुणवत्तेच्या बाबतीत अग्रस्थानी आणण्यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा आहे', अशी मागणी शरद पवार यांनी पत्राद्वारे केली आहे.(Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.