प्रशासन अन्‌ राजकारणात ब्रॅंड 'बारामती हॉस्टेल'चा!

प्रशासन अन्‌ राजकारणात ब्रॅंड 'बारामती हॉस्टेल'चा!
प्रशासन अन्‌ राजकारणात ब्रॅंड 'बारामती हॉस्टेल'चा!
प्रशासन अन्‌ राजकारणात ब्रॅंड 'बारामती हॉस्टेल'चा!esakal
Updated on
Summary

महाराष्ट्राच्या राजकारणाचा नेहमीच केंद्रबिंदू राहिलेल्या बारामती हॉस्टेलची उभारणी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी 1977 मध्ये केली.

महाराष्ट्राच्या (Maharashtra) राजकारणाचा नेहमीच केंद्रबिंदू राहिलेल्या 'बारामती हॉस्टेल'ची (Baramati Hostel) उभारणी राष्ट्रवादीचे (NCP) पक्षाध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी 1977 मध्ये केली. या ठिकाणी होणाऱ्या राजकीय बैठका आणि या बैठकांमधील निर्णयांचे राज्याच्या व देशाच्या राजकारणावर उमटणारे पडसाद, यामुळे पुण्यातील 'बारामती हॉस्टेल' नेहमीच कुतूहलाचा, चर्चेचा विषय राहिला आहे. देशाच्या राजकारणात, प्रशासनात, समाजकारणात, शेतीत व उद्योगक्षेत्रात असलेले अनेक दिग्गज विद्यार्थी दशेत 'बारामती हॉस्टेल'मध्ये राहिले आहेत. महाराष्ट्रातच नव्हे तर देशात आज 'बारामती हॉस्टेल'चा ब्रॅंड तयार झाला आहे. राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त 'बारामती हॉस्टेल'वर टाकलेला हा प्रकाशझोत. (Sharad Pawar's Baramati Hostel is a brand in administration and politics)

प्रशासन अन्‌ राजकारणात ब्रॅंड 'बारामती हॉस्टेल'चा!
लस घ्या, अन्यथा द्यावा लागेल पाचशे ते 50 हजारांपर्यंत दंड

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope), सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatraya Bharne), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे बंधू श्रीनिवास पवार (Shriniwas Pawar), माजीमंत्री जयकुमार रावल (Jayakumar Rawal), आमदार राहुल कुल (Rahul Kul), माजी आमदार शिरीष चौधरी (Shirish Chaudhary), राष्ट्रवादी युवकचे नेते विजय कदम (Vijay Kadam) राजकारणातील या दिग्गज नेत्यांसह महाराष्ट्राच्या व देशाच्या प्रशासनात सध्या कार्यरत असलेल्या व्यक्तींचे वास्तव्य बारामती हॉस्टेलमध्ये होते. ठाण्याचे जिल्हाधिकारी (Collector) राजेश नार्वेकर (Rajesh Narvekar), धुळ्याचे जिल्हाधिकारी संजय यादव (Sanjay Yadav), आयएएस प्रवीण दराडे (Pravin Darade)), हैदराबादमधील पोलिस महानिरीक्षक महेश भागवत (Mahesh Bhagwat), ओरिसामधील (Orissa) आयएएस अधिकारी दत्ता शिंदे (Datta Shinde), दिग्दर्शक परेश मोकाशी (Paresh Mokashi), पुणे (Pune) जिल्ह्यातील बल्लारपूर इंडस्ट्रीचे सीईओ रोहित रैना (Rohit Raina) प्रशासनातील या दिग्गज व्यक्ती विद्यार्थी दशेत 'बारामती हॉस्टेल'ला राहिल्या आहेत. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे बंधू बारामती हॉस्टेलमध्ये राहायला होते. बारामती हॉस्टेलमध्ये चांगल्या पद्धतीचे जेवण असल्याने मंत्री धनंजय मुंडे विद्यार्थी दशेत या ठिकाणी जेवायला येत होते, अशी आठवण हॉस्टेलचे व्यवस्थापक शिवाजी काळे (Shivaji Kale) यांनी सांगितली. आयुष्यात यशाच्या शिखरावर असताना आजही अनेकांच्या मनात आणि हृदयात बारामती हॉस्टेलच्या आठवणी कायम आहेत.

शिक्षणासाठी (Education) महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून पुण्यात येणारे विद्यार्थी बारामती हॉस्टेलची निवड करतात. गरीब व होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला आर्थिक स्थितीचा अडथळा येऊ नये म्हणून बारामती हॉस्टेलमध्ये गेल्या 44 वर्षांपासून विद्यार्थ्यांची अल्पदरात / मोफत राहण्याची व जेवण्याची व्यवस्था केली जाते. दहावीनंतर पुढील शिक्षणासाठी पुण्यात येणारे विद्यार्थी आजही बारामती हॉस्टेलला प्राधान्य देतात. महाराष्ट्राच्या राजकारणात विविध पक्षांत कार्यरत असलेले नेते त्यांच्या नातेवाइकांसाठी मुला / मुलींसाठी बारामती हॉस्टेलला पसंती देतात. बारामती हॉस्टेलने जपलेली विश्‍वासार्हता, सुविधा, नीटनेटकेपणा यामुळेच 44 वर्षांनंतरही पुण्यात राहायचे म्हटले की पहिले नाव बारामती हॉस्टेलचे येते. देशाच्या राजकारणात खासदार शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) कोणत्याही पदावर असोत, राज्याच्या राजकारणात उपमुख्यमंत्री अजित पवार कोणत्याही पदावर असोत ते नेहमी बारामती हॉस्टेलला येतात. महाराष्ट्रातील पवार प्रेमींना पवारांच्या सहवासाची संधी बारामती हॉस्टेलच्या माध्यमातून मिळते.

प्रशासन अन्‌ राजकारणात ब्रॅंड 'बारामती हॉस्टेल'चा!
तुम्ही लसीचे दोन्ही डोस घेतलेत का? निर्बंध झाले आणखी कडक

मोरारजी देसाईंच्या हस्ते भूमिपूजन

पुण्यात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना राहण्याची व्यवस्था व्हावी यासाठी शरद पवार यांनी विद्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुण्यातील गोखलेनगर भागात 1977 मध्ये बारामती हॉस्टेलची स्थापना केली. पाच खोल्यांपासून या हॉस्टेलची सुरुवात झाली होती. आता या ठिकाणी 70 खोल्या आहेत. 30 गुंठे जागेवर बारामती हॉस्टेल साकारले आहे. माजी पंतप्रधान मोरारजी देसाई (Morarji Desai) यांच्या हस्ते बारामती हॉस्टेलचे भूमिपूजन झाले. शरद पवारांचे जिवलग मित्र विठ्ठलशेट मणियार, पुण्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी तथा साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांचे मोलाचे योगदान बारामती हॉस्टेलच्या जडणघडणीत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 1991 पासून बारामती हॉस्टेलमध्ये व्यक्तिश: लक्ष घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे येथील नीटनेटकेपणा, व्यवस्थापन दर्जेदार राहिले आहे. काटेवाडी (ता. बारामती) येथील शिवाजी काळे हे गेल्या 33 वर्षांपासून व्यवस्थापक म्हणून काम पाहात आहेत.

राष्ट्रवादीच्या स्थापनेची घोषणा येथूनच

शरद पवार यांनी 1999 मध्ये कॉंग्रेसमधून (Congress) बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी कॉंग्रेस नावाने नवीन पक्ष स्थापन करत असल्याची घोषणा राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी याच बारामती हॉस्टेलमधून केली होती. देशाच्या संरक्षणपदाची जबाबदारी सांभाळत असतानाही शरद पवार बारामती हॉस्टेलला न चुकता भेट देत होते. राष्ट्रवादी कॉंग्रेस, खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आयुष्यात, महाराष्ट्र व देशाच्या राजकारणात घडलेल्या अनेक घटना व घडामोडींचे बारामती हॉस्टेल साक्षीदार आहे.

पवारांनी शिर्केंचा प्रश्‍न सोडविला

शरद पवार मुख्यमंत्री असताना महाबळेश्‍वर (Mahabaleshwar)) भागातील संतोष शिर्के मुख्यमंत्री कार्यालयात शिपाई म्हणून कामाला होते. या घटनेला अनेक वर्षे झाली. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या मेळाव्यानिमित्त पवार यांनी नुकताच महाबळेश्‍वरचा दौरा केला. या दौऱ्यात शिर्के पवार यांना भेटण्यासाठी आले होते. पवारांनी क्षणातच शिर्के यांना नावासह हाक मारत 'का आलात?' असा प्रश्‍न केला. माझा मुलगा (तेजस शिर्के) शिक्षणासाठी पुण्यात आहे. राहण्याची अडचण आहे. बारामती हॉस्टेलला व्यवस्था झाली तर बरे होईल, अशी व्यथा शिर्के यांनी मांडली. पवारांनी तत्काळ शिर्के यांचा प्रश्‍न सोडविला असल्याची आठवण साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी सांगितली.

प्रशासन अन्‌ राजकारणात ब्रॅंड 'बारामती हॉस्टेल'चा!
पवार, गडकरींना विद्यापीठाची मानद डी.लिट! प्रस्ताव राज्यपालांकडे

लॉकडाउनमध्ये 700 विद्यार्थ्यांना रोज मोफत जेवण

कोरोनाच्या (Covid-19) पहिल्या लाटेला रोखण्यासाठी लॉकडाउन (Lockdown) जाहीर झाला. शिक्षणानिमित्त पुण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या जेवणाची मोठी तारांबळ उडाली. बारामती हॉस्टेलच्या माध्यमातून पुण्याच्या विविध भागातील तब्बल 700 विद्यार्थ्यांना 58 दिवस मोफत जेवण देण्याची व्यवस्था बारामती हॉस्टेलच्या माध्यमातून करण्यात आली. देशावर किंवा महाराष्ट्रावर आलेल्या संकटात मदतीचा हात देण्याकरिता धावून जाण्यासाठी आजही बारामती हॉस्टेल सज्ज आहे. विद्यार्थी दशेतच सामाजिक बांधिलकीची शिकवण देण्यात बारामती हॉस्टेलचा मोठा वाटा राहिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.