Sharad Pawar: आगामी निवडणूक लढवण्याबाबत शरद पवारांचा मोठा निर्णय! म्हणाले, 'मी...'

Sharad Pawar: आगामी निवडणूक लढवण्याबाबत शरद पवारांचा मोठा निर्णय घेतला आहे. आज माध्यमांशी बोलताना आगामी निवडणूक लढवण्याबाबत संकेत दिले आहेत.
Sharad Pawar
Sharad PawarEsakal
Updated on

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर अजित पवार वारंवार शरद पवारांवर टीका करताना दिसून येतात. ठाण्यात मेळाव्यातही बोलताना अजित पवारांनी शरद पवार यांच्या वयावरून पुन्हा एकदा टीका केली. तर एका विशिष्ट वयानंतर थांबलं पाहिजे असंही ते म्हणाले. दरम्यान, आज शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. तर आगामी निवडणूक लढवणार की, नाही याबाबतचे स्पष्टीकरण दिलं आहे.

शरद पवारांनी निवडणूक न लढवण्याचा न मोठा निर्णय घेतला आहे. खासदारकीची सध्याची टर्म संपल्यानंतर मी निवडणूक लढवणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले आहेत.

माझी खासदारकी अडीच वर्षांनंतर संपत आहे. मी ठरवलं आहे, या नंतर निवडणूक लढणार नाही. पण माझी खासदारकीची टर्म शिल्लक आहे. त्यामुळं मी तोपर्यंत काम करतं राहणार आहे. मला लोकांनी तिथं पाठवलंय तिथं मी काम करु नको का? असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. तर माझ्या वयावर सातत्यानं बोललं जातं. मी १९६७ पासून राजकारणात आहे. माझ्या विरोधकांनीही कधी यावर टीका केली नाही.मी अनेक संस्थांचा आजीवन अध्यक्ष आहे, तिथं मी काम करत राहिलं, असंही ते पुढे म्हणाले आहेत.

Sharad Pawar
Shiv Sena MLA Disqualification : उद्या जर वेडावाकडा निकाल आला तर... CM शिंदे-नार्वेकर भेटीवरून उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली शंका

शिवसेना आमदार अपात्रतेवर काय म्हणाले?

शिवसेना पक्षफुटीनंतर निर्माण झालेल्या ऐतिहासिक राजकीय पेचावर उद्या बुधवारी (ता. १०) सायंकाळी चार वाजता निकाल दिला जाणार आहे. निकाल प्रलंबित असतानाच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी भेट घेतली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. या संपुर्ण प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत भाष्य केलं आहे.

'साधी सरळ गोष्ट आहे, ज्यांच्यापुढे केस आहे आणि ज्यांची केस आहे त्यांनी ती मांडणं यात काही चुक नाही. पण, ज्याच्याकडे केस मांडली जाते आणि ज्यांचा निर्णय अभिप्रेत आहे तेच जर ज्यांची केस आहे, त्यांच्याकडे जात असतील तर शंकेला, संशयाला जागा निर्माण होते. जर हे केलं नसतं तर या पदाची प्रतिष्ठा चांगली राहिली असती, असं शरद पवारांनी यावेळी म्हटलं आहे.

Sharad Pawar
Income Tax Raid: ठाकरे गटाला दुसरा मोठा धक्का! रविंद्र वायकर नंतर आता राजन विचारेंच्या घरी आयकर विभागाचा छापा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.