Sharad Pawar: '1980 मध्ये मला सगळे सोडून गेले होते पण...', शरद पवारांचा अजित पवारांना इशारा

अजित पवारांच्या बंडावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
Sharad Pawar
Sharad PawarEsakal
Updated on

राजकीय वर्तुळात आज मोठ्या घडामोडी घडल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राजभवनातील दरबार हॉलमध्ये आज अजित पवार यांच्यासह 9 जणांचा मंत्रीपदाचा शपथविधी सोहळा पार पडला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तर इतर आठ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. (Latest Marathi News)

यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत याबाबतची आपली भूमिका मांडली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, दोन दिवसांपूर्वी देशाच्या पंतप्रधान मोदी यांनी एक वक्तव्य केलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल त्यांची विधानं होतं कि, राष्ट्रवादी पक्ष भ्रष्टाचारात सापडलेला पक्ष आहे. हे सांगत असताना त्यांनी राज्य सरकारची लँड याचा उल्लेख केला होता.

त्याबरोबर सिंचनशी संबंधित काही तक्रार होती. त्याबाबत उल्लेख केला. हा जो उल्लेख त्यांनी केला आणि राष्ट्रवादी पक्ष या भ्रष्टाचारात सहभागी आहे, असा उल्लेख केला. मला आनंद आहे की, आज मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही सहकाऱ्यांना त्यांनी शपथ दिली आहे. (Latest Marathi News)

Sharad Pawar
Ajit Pawar: अजित पवारांकडे पुन्हा जलसंपदा? राष्ट्रवादीला मिळणारी ही मंत्रिपदे?

तर पुढे ते म्हणाले, 6 जुलै रोजी बैठक बोलावण्यात आली होती, मात्र त्याआधी काही सहकाऱ्यांनी वेगळी भूमिका घेतली. किती लोकांनी वेगळी भूमिका घेतली हे समोर येईल. आजचा हा प्रकार माझ्यासाठी नवा नाही, 1980 साली मला अनेक जण सोडून गेले होते. तेव्हा मी पक्ष पुन्हा बांधला. त्यामुळे हा प्रकार माझ्यासाठी नवीन नाही असं शरद पवार यांनी म्हंटलं आहे.(Latest Marathi News)

पुढे ते म्हणाले, मला आठवतंय की, १९८० साली निवडणुकीनंतर मी ज्या पक्षाचं नेतृत्व करत होतो. त्या पक्षाचे ५८ आमदार निवडून आले होते. एक महिन्यानंतर त्या ५८ पैकी ६ सोडले सगळे नेते पक्ष सोडून गेले. मी ५८ जणांचा विरोधी पक्षनेता झालो होतो. पण त्यानंतर मी पाचच लोकांचा नेता राहिलो. मी ५ लोकांना घेऊन पक्ष बांधायला मी महाराष्ट्रात निघालो होतो. त्यानंतर पाच वर्षांनी निवडणूक झाली त्यामध्ये आमची संख्या ६९ वर गेली. संख्या वाढली. नुसतीच वाढली नाही तर जे पक्ष सोडून गेले त्यापैकी तीन ते चार जण सोडले तर सगळे पराभूत झाले. त्यामुळे १९८० साली जे चित्र दिसलं ते चित्र पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेसमोर कसं उभं करता येईल, हा माझा एककलमी कार्यक्रम राहील असं ते म्हणाले आहेत.

तर त्यावेळी ज्यांनी पक्षाला सोडलं त्यापैकी 3 ते 4 जण सोडले तर सर्वजण पराभूत झाले. माझा राज्यातील जनतेवर पूर्ण विश्वास आहे. मी फक्त काही जणांचा नेता होतो, मी पक्ष पुन्हा बांधला. जे घडलं त्याची मला चिंता नाही. पक्षावर दावा केला तर मी लोकांमध्ये जाणार असंही शरद पवार पुढे म्हणाले आहेत.(Latest Marathi News)

Sharad Pawar
Ajit Pawar: अजित पवारांनी त्यांच्या ट्विटर बायोमध्ये कोणता मोठा बदल केला जाणून घ्या

आधीही अनेक आमदार पक्ष सोडून गेले आहेत. नेत्यांना भ्रष्टाचारी आरोपातून मुक्त केले याबद्दल त्यांचे आभार. अजित पवार यांनी पक्ष फोडला. अजित पवार यांनी राजीनामा दिला याची मला माहिती नव्हती. कुणी काहीही दावा केला असला तरी आम्ही लोकांमध्ये जाऊन आमची भूमिका मांडू. उद्या कराडला प्रीतीसंगम येथे जाऊन यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचं दर्शन घेणार असल्याचंही शरद पवार यावेळी म्हणाले आहेत. (Latest Marathi News)

Sharad Pawar
NCP Leader: शिंदे-फडणवीस सरकारमधील पहिली महिला मंत्री म्हणून अदिती तटकरेंनी घेतली शपथ

तर १९८० साली जे चित्र दिसलं तेच चित्र पुन्हा कसे उभे राहील हेच माझे आता एककलमी सूत्र असेल. महाराष्ट्रात जिथे जाता येईल तिथे जाणार. आमची संख्या वाढवणार. देशाच्या कानाकोपऱ्यातून मला फोन येत आहेत. या वेळी आम्ही एक आहोत. पर्यायी शक्ती उभी करावी असे म्हणणारे आहेत ते सोबत आहेत त्यामुळे चिंता नाही. उद्या सकाळी मी बाहेर पडणार आहे असं शरद पवार म्हणालेत. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.