शरद पवारांचे ब्राम्हण महासंघाला चर्चेचे निमंत्रण; शनिवारी होणार बैठक

Sharad Pawars program on Saturday No carrying of pens for safety reasons
Sharad Pawars program on Saturday No carrying of pens for safety reasonsSharad Pawars program on Saturday No carrying of pens for safety reasons
Updated on

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) शनिवारी (ता. २१) राज्यातील ब्राम्हण संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहे. या चर्चेसाठी २० ते २२ संघटनांना शरद पवारांनी निमंत्रण दिले आहे. पवारांच्या कार्यक्रमासाठी (program) चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव कार्यक्रमात पेन नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. (Sharad Pawars program on Saturday No carrying of pens for safety reasons)

शरद पवार यांचा कार्यक्रम पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात सायंकाळी पाच वाजता पार पडणार आहे. अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाबरोबर अनेक ब्राम्हण संघटनांना कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. २० ते २२ संघटना चर्चेसाठी कार्यक्रमाला उपस्थित राहतील. यावेळी राज्यातील वातावरण निवळण्याचा बैठकीच्या माध्यमातून प्रयत्न होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Sharad Pawars program on Saturday No carrying of pens for safety reasons
तमंचे वाली दुल्हनिया : सासरी पोहोचताच नववधूने केला गोळीबार

काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा कार्यक्रम पार पडला होता. या कार्यक्रमात चांगलाच गोंधळ उडाला होता. कार्यकर्त्यांवर विनयभंगाचे गुन्हेही दाखल करण्यात आले होते. हा वाद अद्याप शांत झालेला नाही. अशात शनिवारी शरद पवार (Sharad Pawar) यांचा कार्यक्रम होऊ घातला आहे. या कार्यक्रमात कोणताही गोंधळ होऊ नये म्हणून बालगंधर्व रंगमंदिरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

नंबर नोंदणीचे काम सुरू

सुरक्षेच्या कारणास्तव कार्यक्रमात (program) कोणालाही पेन (No carrying pen) नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. सोबतच पाण्याच्या बाटल्या व बॅग नेण्यासही बंदी घालण्यात आली आहे. पोलिसांकडून कार्यक्रमाला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे नाव आणि नंबर नोंदणीचे काम सुरू झाले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडल्यास सर्वांची माहिती असावी यासाठी असे केले जात आहे. याच कारणास्तव पवारांच्या कार्यक्रमाला मोठा पोलिस बंदोबस्त राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.