Sharad Pawar : कर्नाटक वादावर शरद पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, मुख्यमंत्री...

Sharad pawar
Sharad pawarsakal
Updated on

बेळगावः महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा प्रश्न वरचेवर चिघळत चालला आहे. महाराष्ट्राच्या मंत्र्यांना बेळगावात येऊ न देण्याची भूमिका घेतलेल्या कन्नड रक्षण वेदिके या संघटनेने महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला केला आहे. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावमध्ये रास्ता रोको आंदोलन केलं. हिरबागेवाडी येथील टोलनाक्यावर महाराष्ट्राच्या सहा वाहनांवर या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचेप्रमुख शरद पवार यांची प्रतिक्रिया आली आहे. (Sharad Pawar news in Marathi)

Sharad pawar
Breaking: सीमावाद चिघळला! 'कन्नड वेदिके' संघटनेकडून महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक

शरद पवार म्हणाले की, बेळगावात मराठी लोक दहशतीत आहेत. सीमा प्रश्नावर निर्णय घेण्याची वेळ आली आहे. बेळगावमध्ये जे काही घडलं ते निषेधार्ह आहे. हे प्रकरण मागील आठवड्यापासून वेगळ्या स्वरुपात पुढं करण्याचा जाणीवपूर्णक प्रयत्न कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा आहे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी २० नोव्हेंबरला जतबाबत भूमिका मांडली. २४ नोव्हेंबर रोजी अक्कलकोटबाबत भूमिका मांडली. तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही, असं म्हटलं.

दरम्यान कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी वादग्रस्त भूमिका घेतली आहे. त्यामुळेच सीमाभागातील परिस्थिती गंभीर झाली आहे. आम्ही या प्रश्नावर अनेकदा लाठ्या काठ्या झेलल्या. सत्यग्रह केला. त्यामुळे मला या प्रश्नाची चांगली जाण आहे. मात्र बोम्मई यांच्या वक्तव्यांमुळेच ही परिस्थिती बिघडल्याचं शरद पवार यांनी नमूद केलं.

हेही वाचा शेतमजूर ते कॅनाॅल मॅन...जाणून घ्या एक यशोगाथा....

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()