Mumbai News - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत केलेल्या विधानावरून राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करून अजित पवार सत्तेत सामील झाले. त्यावर सुप्रिया सुळे यांनी आधीच पक्षात फूट पडली नसल्याचं म्हटलं होतं. त्यातच शरद पवार यांनी अजित पवार आमचेच नेते असल्याचं म्हटलं. यावर विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया आली आहे.
वडेट्टीवार म्हणाले की, शरद पवार यांच्या विधानाचा अर्थ देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना विचारला तर बरं होईल. आज राजकारण अस्थिर झाल आहे. सध्या शब्दावर,अश्वासनावर विश्वास कोणी ठेवू शकत नाही, कारण, भाजपने राजकारण नासवलं आहे. एक कार्टून आलं होतं. त्यात राजकारण्यांना काट्यांची खाट दिली होती.
त्यावर राजकीय नेत्यांना बसण्यास भाग पाडलं. जेणेकरून त्यांच्या पार्श्वभागात काटे टोचतील. सध्याच्या राजकीय स्थिती अशीच आहे. मात्र निवडणुकीच्या मैदानात सर्वकाही स्पष्ट होईल. कोण कोणासोबत आहे हेही कळेल, अशी उद्विग्न प्रतिक्रिया वडेट्टीवार यांनी दिली.
शरद पवार हे मोठे नेते आहेत, कोर्टात केस सुरू होईल म्हणून त्यांच्या स्ट्रॅटजीचा तो भाग असू शकतो. पहाटेच्या वेळी शपथविधी झाला होता. मात्र त्यानंतर सरकार बदललं होतं. प्रत्येक पक्ष काम करताना अनेकदा शेवटच्या क्षणी फूट पडते, त्यावर ते आपला प्लॅन बी ठेवतात. कोण कुठे जातं हे निवडणुकीत स्पष्ट होईल.
स्वार्थासाठी अनेक लोक बरबटले आहेत, लोकांशी देणं घेणं राहिलं नाही, निवडणुकीतच चित्र स्पष्ट होईल, INDIA च्या पाठीमागे लोक असतील, भाजप सरकारची लोकप्रियता संपल्याचा दावाही त्यांनी केला. (Latest Marathi News)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.