Sharad Pawar : NCPच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर दावा सांगणाऱ्या अजित पवार गटाला शरद पवारांचे उत्तर; म्हणाले...

NCP Chief Sharad Pawar
NCP Chief Sharad Pawaresakal
Updated on

राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार की अजित पवार यावरून पक्षातील दोन गटात वाद सुरू आहे. अजित पवार गटातील नेते अजित पवार हेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचा दावा केला जात आहे. यादरम्यान राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या प्रकरणी भाष्य केलं आहे. जुन्नरमध्ये झालेल्या पत्रकारपरिषदेत बोलताना शरद पवारांनी इतरही वेगवेगळ्या मुद्द्यावर भाष्य केलं.

राष्ट्रवादी कोणाची या मुद्द्यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, मी महाराष्ट्रात फिरतोय सर्वसामान्य लोकांमध्ये स्वच्छ कल्पना आहे. सामान्य लोक काय विचार करतो हे महत्वाचं आहे. काल किल्लारीत होतो. तेथे २० हजार लोकं होते. राज्यात सगळीकडे हे चित्र दिसतंय. वेगळी भूमिका घेतली असेल तर तो त्यांचा लोकशाहीमधील अधिकार आहे. त्यावर मी भाष्य करू इच्छीत नाही.

पण आज महाराष्ट्रात आणि बाहेर सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संस्थापक कोण आहे ते सर्वांना माहिती आहे. त्यामुळे लोकांची भावना ही अनुकूल आहे असं आमचे लोक सांगतात त्यात तथ्य आहे असेही शरद पवार म्हणाले.

NCP Chief Sharad Pawar
Ajit Pawar News : अजित पवारांसोबत खडाजंगी झाल्याच्या चर्चांवर भुजबळांचं स्पष्टीकरण; म्हणाले...

जुन्नरची जागा कोणाकडे?

आगामी निवडणूकीत जुन्नर तालुक्यातून शरद पवार गटाचा चेहरा कोण असेल? असा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला. याला उत्तर देताना शरद पवरांनी निवडणूकांना अजून वेळ असल्याचे सांगितलं. तसेच जुन्नर तालुक्यातील लोकांशी माझा अनेक वर्षातील अनुभव आहे ते सहसा माझ्या शब्दाला कधी नकार देत नाहीत असेही शरद पवार म्हणाले.

NCP Chief Sharad Pawar
Commercial LPG Cylinder Price Hike : सणासुदीच्या काळात महागाईचा मोठा धक्का! एलपीजी गॅस सिलिंडर 'इतक्या' रुपयांनी महागले

आगामी निवडणूकीला उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेना, काँग्रेस पक्ष आणि ज्या पक्षाचा मी संस्थापक आहे तो पक्ष एकत्रित सामोरे जाणार आहोत. त्याच्यामध्ये आमचं जे सुत्र आहे त्यानुसार जुन्नरची जागा ही ज्याचा मी अध्यक्ष आहे त्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहिल असेही शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

तसेच अजित पवार गटातील आमदार अतुल बेनके यांच्यासोबत मी जेवण केलं अशी माहिती देखील शरद पवार यांनी यावेळी दिली. वाघनखांबद्दल वाद निर्माण करावा असं मला वाटत नाही असेही शरद पवार म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.