Sharad Yadav Death : मोदींचा तीव्र विरोध करायचे शरद यादव, का द्यावा लागला होता भाजपला पाठिंबा ?

गोल्ड मेडलिस्ट इंजिनीयर ते 11 वेळा खासदार असा शरद यादव यांचा प्रवास
Sharad Yadav Death
Sharad Yadav Deathesakal
Updated on

Sharad Yadav Death : जेडीयूचे माजी अध्यक्ष शरद यादव यांचं काल रात्री प्रदीर्घ आजाराने निधन झालं. शरद यादव यांच्या निधनाने राजकारणातील अजातशत्रू आणि समाजवादी विचारा खंदा पुरस्कर्ता नेता हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. गोल्ड मेडलिस्ट इंजिनीयर ते 11 वेळा खासदार असा शरद यादव यांचा प्रवास राहिला आहे.

Sharad Yadav Death
Matar Kachori Recipe: खायला खमंग खरपुस मटर कचोरी घराच्या घरी कशी तयार करावी?

शरद यादव हे जेपी आंदोलनातून उदयाला आलेले समाजवादी नेते होते. या चळवळीने बिहारमध्ये तीन राजकारण्यांना जन्म दिला, जे नंतर बिहारच्या राजकारणाचे केंद्रस्थान बनले. एक होते लालू प्रसाद यादव, दूसरे होते नितीश कुमार आणि तिसरे रामविलास पासवान. मात्र नितीश आणि लालू वेगळे झाले, तर रामविलास यांनीही इकडे-तिकडे फिरत राहून स्वत:चा पक्ष काढला.

Sharad Yadav Death
Winter Outfit : तुम्ही सुद्धा बनू शकता किंग खान, पहा शाहरुखच्या विंटर आउटफिट टिप्स

यात आणखीन एक महारथी होते ते म्हणजे शरद यादव.

1997-98ची ही गोष्ट आहे. जनता दलाच्या अध्यक्षपदी शरद यादव यांची निवड झाली होती. त्यामुळे लालूप्रसाद यादव नाराज झाले होते. चारा घोटाळ्यात तुरुंगात जाण्यापूर्वी लालूंनी जनता पार्टीला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रीय जनता दलाची स्थापना केली. विशेष म्हणजे कोर्टाच्या देखरेखीखाली जनता दलाच्या अध्यक्षपदाची निवडणूक झाली होती. तरीही लालूंनी पक्ष सोडला.

Sharad Yadav Death
Travel Tips : हिवाळ्यात हवीय उन्हाळ्याची मज्जा ?या हॉट स्प्रिंग्स डेस्टिनेशनला नक्की भेट द्या

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे 1990 ते 1995 पर्यंत लालू प्रसाद यांनीच शरद यादव यांना दिल्लीत सर्वाधिक सपोर्ट केला होता. जनता दलातून लालूप्रसाद यादव, मुलायमसिंह यादव, चमनभाई यादव आदी नेते बाहेर पडल्याचं शरद यादव यांना अखेरपर्यंत शल्य होतं.

Sharad Yadav Death
Vastu Tips: बाहेरून आल्यानंतर चप्पल नेमकी कोणत्या दिशेला ठेवावी?

1990मध्ये नितीश कुमार आणि जॉर्ज फर्नांडिस सारखे नेत्यांनी भाजपला पाठिंबा दिला होता. तर लालूप्रसाद यादव काँग्रेससोबत होते. मात्र भजपला पाठींबा द्यायला शरद यादव तयार नव्हते. भाजपच्या अनेक नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध होते. असं असूनही जेडीयूने भाजपशी हातमिळवणी करावी असं त्यांना वाटत नव्हतं. पण जॉर्ज फर्नांडिस आणि नितीश कुमार आणि मग रामविलास पासवान यांच्या सांगण्यावरून शरद यादव यांनाही 'हो' म्हणावे लागले.

Sharad Yadav Death
Astro Tips : दर बुधवारी करा बुध ग्रहाच्या या मंत्रांचा जप! कसलीच कमी भासणार नाही..

शरद यादव आता भाजपच्या तंबूत दाखल झाले होते. काळाचे चाक फिरले. दोन दशकांहून अधिक काळ लोटला. गुजरातचे मुख्यमंत्री असलेले नरेंद्र मोदी यांची एनडीएमध्ये बढती होऊ लागली, पण तिकडे बिहारमध्ये काहीतरी वेगळीच खिचडी शिजत होती.

Sharad Yadav Death
Bone Health : सावधान ! हे पदार्थ तुमची हाडे खिळखिळी करतात

शरद यादव यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, नितीश कुमार यांना नरेंद्र मोदी कधीच आवडले नाहीत. 2012 मध्ये राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारांच्या नावांच्या घोषणेच्या वेळीही असा संघर्ष पाहायला मिळाला होता. याच दरम्यान आगामी निवडणुकीत पंतप्रधानपदाच्या उमेदवाराची चर्चा सुरू झाली होती.

Sharad Yadav Death
Travel Tips : हिवाळ्याच्या सुट्यांमध्ये कुठे जायचा प्रश्न पडलाय? अंदमानमधल्या या ठिकाणांना नक्की भेट द्या

नितीश कुमार म्हणाले होते की,देशाचा पंतप्रधान धर्मनिरपेक्ष असावा. दुसरीकडे, आरएसएस प्रमुख मोहन भागवत म्हणाले होते की, हिंदुत्ववादी चेहरा पंतप्रधानपदाचा उमेदवार का असू शकत नाही. मात्र, २०१३ मध्ये भाजपने नरेंद्र मोदींना प्रचार समितीचे अध्यक्ष बनवल्यानंतर नितीश यांनी एनडीएशी फारकत घेण्याचा निर्णय घेतला.

Sharad Yadav Death
Saturday Astro Tips : शनिदेवांना तेल अर्पण करतांना चुकूनही या अवयवावर वाहू नका तेल, होईल नुकसान

नितीश कुमार यांनी भाजपपासून फारकत घ्यायची होती, पण तोपर्यंत शरद यादव भाजपच्या प्रेमात बुडाले होते. पण यावेळी देखील त्यांना नितीशकुमारांच्या आग्रहापुढे नमते घ्यावे लागले आणि जेडीयू आणि भाजप वेगळे झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.