राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावरील हल्ला केल्याप्रकरणी एसटी महामंडळाकडून 118 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलं होतं. या कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा कामावर रूजू करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. यानंतर या सर्व एसटी कर्मचाऱ्यांनी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या घराबाहेर आनंद साजरा केला आहे. ढोल ताशांच्या गजरामद्धे गुलाल उधळत एसटी कर्मचाऱ्यांनी जल्लोष केला. यावेळी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी राज्य सरकारचेही आभार मानले आहेत.
या कर्मचाऱ्यांना आठ महिन्यांनंतर पुन्हा कामावर घेतलं जाणार असून त्याच्या पूर्वीच्याच जागी आणि पदावर कामावर त्यांना रुजू करुन घेतलं जाणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच सरकारकडून मोठी भेट मिळाली असल्याचा आनंद या कर्मचाऱ्यानी व्यक्त केला आहे.
यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी मागील सरकारवर त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. तर आज (गुरुवार) पासून सेवेत रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सरकारचे आभार मानले आहेत.
एसटी संपाच्या काळात बडतर्फ केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील आठवड्यात दिले होते. एसटी महामंडळ यांच्यासह मुख्यमंत्र्यांची बैठक पार पडली होती. या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिले. संप काळात जवळपास 118 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले होते. या कर्मचाऱ्यांना आता मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पुन्हा सेवेत घेण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.