Raj Thackeray : ''माझ्याही मुलीला वाट्टेल तसे मेसेज येतात'', शर्मिला ठाकरेंनी व्यक्त केला संताप

Raj Thackeray
Raj Thackerayesakal
Updated on

मुंबईः डीपफेक प्रकरणावरुन सध्या वातावरण तापलेलं आहे. महिला-मुलींना भविष्यात भीषण संकटांना सामोरं जावं लागणार असल्याचं दिसून येतंय. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही डीपफेकचं संकट बोलून दाखवलं होतं. त्यातच आता राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी त्यांच्या मुलीला होणाऱ्या त्रासाबद्दल भाष्य केलं आहे.

शर्मिला ठाकरे म्हणाल्या की, आम्हीही यातून जातोय. माझ्या मुलीला 'यु ट्यूब'वर काही लोक वाट्टेल तसे मेसेज करत असतात. याबाबत मी नेहमी पोलिस आयुक्तांकडे तक्रार करते. तेही फारकाही करु शकत नाहीत. अटक करतात परंतु त्या मुलांना कायद्याप्रमाणे सोडून द्यावं लागतं.

Raj Thackeray
Cartridge in Nagpur: खळबळजनक ! हिवाळी अधिवेशन सुरु असताना नागपुरात आढळली १५७ जिवंत काडतुसं, ATSकडून तपास सुरु

ठाकरे पुढे म्हणाल्या, आपल्याकडे ब्रिटिशकालीन कायदे आहेत, त्यामुळे आरोपींना सोडून द्यावं लागतं. त्यामुळे कायदे बदलले पाहिजेत. विधानसभेत कायद्यात बदल करणं अपेक्षित असल्याचं ठाकरेंनी स्पष केलं. ऑनलाईनचं हे संकट भविष्यात उग्र रुप धारण करण्याचा धोका यातून दिसून येत आहे.

Raj Thackeray
Agriculture: दुष्काळात तेरावा महिना ! अवकाळी पावसामुळे त्रस्त शेतकऱ्यावर आणखी संकट, 'या' अळीमुळे हरभरा उत्पादक संकटात

मागील काही दिवसांपासून आलिया भट्ट, कतरिना कैफ, रश्मिका मंदाना या अभिनेत्री डीपफेकच्या शिकार झालेल्या आहेत. अनेकांकडून अशा व्हिडीओ बनवणाऱ्यांवर कायदेशीर कारावई करण्याची मागणी होत आहे. एआय तंत्रज्ञान वापरुन असे व्हिडीओ बनवले जातात आणि व्हायरल केले जातात. त्यामुळे या संकटाला सरकारं कशी तोंड देणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.