मुंबई : शीना बोरा हत्याकांड (Sheena Bora Murder Case) प्रकरणात इंद्राणी मुखर्जीला शिक्षा झाली होती. विशेष सीबीआय न्यायालयानं दोन दिवसांपूर्वी जामीन मंजूर केला असून आज मुखर्जीची भायखळा तुरुंगातून (Sheena Bora Released From Byculla Jail) सुटका झाली आहे. इतक्या दिवसानंतर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर इंद्राणीने माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.
शीना बोरा हत्याकांडात गेल्या साडेसहा वर्षांपासून तुरुंगात असलेल्या इंद्राणीला दोन लाख रुपयांच्या व्यक्तीगत हमीपत्रावर विशेष सीबीआय कोर्टाने जामीन मंजूर केला होता. त्यानंतर इंद्राणीची आज अखेर भायखळा तुरुंगातून सुटका झाली आहे. मला खूप आनंद झाला असल्याची प्रतिक्रिया तिने माध्यमांसोबत बोलताना दिली.
नेमकं प्रकरण काय? -
गेल्या २०१५ ला पेणच्या जंगलात एक मृतदेह आढळून आला होता. त्या मृतदेहाची फॉरेन्सिंक चाचणी केली असता हा मृतदेह शीना बोराचा असल्याचं पोलिस तपासात समोर आलं होतं. पण, ही हत्या २०१२ ला झाली होती. त्यानंतर पोलिसांनी इंद्राणीसह तिच्या गाडीचा चालक आणि आणखी काही जणांना अटक केली होती. पोलिसांनी तपास केला असता, इंद्राणीने मुखर्जीने आपल्या मुलीचा दुसऱ्या पतीच्या मदतीने खून केला असल्याचं समोर आलं होतं. शीना बोरा ही इंद्राणीची मुलगी होती. या हत्येच्या कटात तिचा दुसरा नवरा संजीव खन्ना आणि वाहनचालक शामवर राय यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला होता. या हत्येबद्दल माहिती असल्याचा आरोप तिचा तिसऱ्या नवऱ्यावर म्हणजे पीटर मुखर्जीवर ठेवण्यात आला आहे. पण, न्यायालयानं पीटरची सुटका यापूर्वीच केली आहे. तेव्हापासून ती भायखळा तुरुंगात आहे. वैद्यकीय कारणांमुळे तिने उच्च न्यायालयात जामीन मंजूर करण्याची मागणी केली होती. मात्र ही मागणी नामंजूर झाल्यामुळे तिने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.