Jayant Patil: माढ्याच्या जागेवर शेकापचा दावा; मविआकडं केली अनिकेत देशमुखांच्या उमेदवारीची मागणी

शेतकरी कामगार पक्षानं महाविकास आघाडीकडं माढ्यातील जागेवर दावा केला आहे.
Jayant Patil_Sharad Pawar
Jayant Patil_Sharad PawarEsakal
Updated on

मुंबई : शेतकरी कामगार पक्षानं महाविकास आघाडीकडं माढ्यातील जागेवर दावा केला आहे. या मतदारसंघातून गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख यांना खासदारकीची उमेदवारी जाहीर करावी अशी मागणी शेकापचे नेते जयंत पाटील यांनी केली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. (shetkari kamgar party jayant patil claim on madhya lok sabha constituency demand for aniket deshmukh candidature)

Jayant Patil_Sharad Pawar
Satyendra Jain: दिल्लीचे माजी मंत्री सत्येंद्र जैन यांचा तुरुंगवास निश्चित; तातडीनं आत्मसमर्पणाचे सुप्रीम कोर्टाचे आदेश

शरद पवारांच्या भेटीनंतर जयंत पाटील म्हणाले, "माढा मतदारसंघात मी गेलो होतो तिथल्या जागेवर आमच्या शेकापनं दावा केला आहे. या ठिकाणी गणपतराव देशमुखांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख यांच्या उमेदवारीची मागणी आम्ही केली आहे. (Latest Marathi News)

काल मी माढ्यातील काही प्रमुख नेत्यांबरोबर चर्चा केली, त्यानंतर महाविकास आघाडीसमोर आमची मागणी ठेवली आहे. पहिल्यापासून आमचा हा आग्रह आहे की जागेपेक्षा महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येणं महत्वाचं आहे. यासाठी आमचं थोडंफार नुकसान झालं किंवा एखादी जागा मिळाली नाही तरी चालेल"

Jayant Patil_Sharad Pawar
Sajjan Jindal: JSW ग्रुपचे एमडी सज्जन जिंदाल यांच्याविरोधातील बलात्काराचा गुन्हा मागे; मुंबई पोलिसांनी सांगितलं कारण

पण महाविकास आघाडी एकत्र येऊन महाराष्ट्रात सध्या जे वातावरण तयार झालं आहे त्याला तडा जाऊ नये, हा आमचा प्रयत्न आहे. अनिकेत देशमुख हे डॉक्टर आहेत विशेषतः त्यांची प्रतिमा चांगली आहे. विधानसभेला ते केवळ ४०० मतांनी पडले होते. त्यांच्यामागे गणपतराव देशमुखांचं नाव आहे. आमची जवळपास दीड लाख मतं माढा मतदारसंघात आहेत. पण यावर एकमत झालं पाहिजे यासाठी मी प्रयत्न करतो आहे. (Marathi Tajya Batmya)

जरी आमच्या बाजूनं निर्णय झाला नाहीतरी मी महाविकास आघाडीसोबत आणि इंडिया आघाडीसोबत राहणार आहोत. महाविकास आघाडी स्थापन झाली तेव्हा महाराष्ट्रात गेल्या खेपेला आमचं नुकसान झालं. आमच्या उमेदवारांचा विश्वासघात केला गेला. ते लोक आता सोडून गेलेले आहेत त्यामुळं आमची मविआकडं तक्रार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.