ShilPhata Traffic: शिळफाट्यावरील वाहतूक कोंडीचा विद्यार्थ्यांना फटका, शाळा बंद ठेवण्याची नामुष्की

Kalyan Traffic Problem: एमएमआरडीएच्या ढिसाळ नियोजनामुळे कल्याण शीळ रोडवर वाहन कोंडी
: शिळफाट्यावरील वाहतूक कोंडीचा विद्यार्थ्यांना फटका, शाळा बंद ठेवण्याची नामुष्की
ShilPhata Trafficsakal
Updated on

Dombivli Traffic: कल्याण शीळ रोडवरील वाहन कोंडीची समस्या नित्याचीच त्यात आता भर पडली आहे ती येथे सुरु करण्यात आलेल्या मेट्रोच्या कामाची. या कामामुळे या मार्गावरील केवळ सिंगल लेन सुरु असून यामुळे मोठ्या प्रमाणात वाहन कोंडी होत आहे. याचा फटका केवळ चाकरमान्यांना नाही तर शाळेच्या विद्यार्थ्यांना देखील बसत आहे.

शाळेतील विद्यार्थी दररोज शाळेत लेट जात असून बुधवारी तर डोंबिवलीतील विद्यानिकेतन शाळा प्रशासनावर दुपारच्या सत्रातील शाळा रद्द करण्याची नामुष्की ओढावली. या वाहन कोंडीमुळे विद्यार्थ्यांच्या शालेय अभ्यासावर परिणाम होणार असून एमएमआरडीएच्या ढिसाळ नियोजनामुळे कल्याण शीळ रोड आणखी कोंडीत रुतला आहे.

: शिळफाट्यावरील वाहतूक कोंडीचा विद्यार्थ्यांना फटका, शाळा बंद ठेवण्याची नामुष्की
Kalyan : घाटकोपरची पुनर्रावृत्ती होण्यापूर्वी कारवाई करा, मोठागाव - माणकोली पूलाला लागून अनधिकृत होर्डिंग्ज

कल्याण शीळरोडचे सुरु असलेल्या सिमेंट कॉंक्रीटीकरणाच्या कामामुळे गेले अनेक वर्षे येथील नागरिक या मार्गावरील वाहन कोंडीचा त्रास सहन करत आहेत. काही प्रमाणात सिमेंट कॉंक्रीटीकरणचे चार ते पाच लेनचे काम पूर्ण झाल्याने यंदा चार पाच तास वाहन कोंडीत अडकून पडावे लागणार नाही असा काहीसा विचार करत असतानाच येथील प्रवाशांच्या माथी एमएमआरडीएने मेट्रोचे काम आणून टाकले आहे. सिमेंट कॉक्रीटीकरणे काम पूर्ण झाल्यानंतर एमएमआरडीएला मेट्रो मार्गिकेची उपरती झाली असून मेट्रोसाठी खांब खोदण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहन कोंडीची समस्या निर्माण होऊ लागली आहे.

नुकत्याच शाळा सुरु झाल्या असून या मार्गावर अनेक मोठमोठ्या शाळा आहेत. या शाळांमध्ये दिवा, कल्याण, डोंबिवली, ठाकुर्ली आदि परिसरातून विद्यार्थी येत असतात. या वाहन कोंडीचा फटका शाळेच्या बसला देखील बसू लागला आहे. दररोज शाळेच्या बस सुमारे अर्धा ते पाऊण तास उशीरा शाळेत पोहोचत आहेत.

बुधवारी देखील या वाहन कोंडीचा फटका कल्याण ग्रामीण मधील विद्यानिकेतन शाळेला बसला. सकाळच्या सत्रातील विद्यार्थ्यांची शालेय बस या एक तास उशीरा आल्या. या बस पुन्हा शहरात जाऊन दुपारच्या सत्रातील मुलांना कधी घेऊन येणार ती वेळ बसत नसल्याने अखेर शाळा प्रशासनाने दुपारच्या सत्रातील शाळेला सुट्टी दिली. वाहन कोंडीमुळे शाळा बंद ठेवण्याची नामुष्की शाळा प्रशासनावर ओढावल्याचे यामुळे दिसून आले.

: शिळफाट्यावरील वाहतूक कोंडीचा विद्यार्थ्यांना फटका, शाळा बंद ठेवण्याची नामुष्की
Kalyan: कल्याणमधून विधानसभा निवडणूक लढवणारच, काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटेंचा निर्धार

जी शाळा सकाळी 10.30 ला सुरु होते त्या मुलांच्या शाळेच्या बस या 10.20 पर्यंत शाळेत येतात त्या 11.30 ला शाळेत आल्या. त्यामुळे या बस यापुढे जाऊन दुपारच्या सत्रातील मुलांना कधी आणणार त्यामुळे आम्ही दुपारच सत्र रद्द केल. डोंबिवलीतील वाहन कोंडीची समस्या आहेत. परंतू कल्याण शीळ रोड वरील मेट्रोच्या कामामुळे अनेक शाळेच्या बसेसवर परिणाम होत आहे. बऱ्याच शाळांचे विद्यार्थी कल्याण डोंबिवलीहून येत असतात. आधीच हा रस्ता लहान त्यात कामामुळे आणखी लहान झाला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे बॅरिकेट्स टाकून ठेवले आहेत. त्यामुळे सिंगल लेन चालू असते या सगळ्याचा परिणाम वाहन कोंडी जास्त झाली आहे.

विवेक पंडीत, संस्थापक अध्यक्ष, विद्यानिकेतन शाळा

: शिळफाट्यावरील वाहतूक कोंडीचा विद्यार्थ्यांना फटका, शाळा बंद ठेवण्याची नामुष्की
Mumbai Ice Cream Case: मुंबईमधील आईस्क्रीममध्ये सापडलेलं मानवी बोट कोणाचं? पुण्याच्या कनेक्शनचा पोलिसांनी केला खुलासा

अत्यंत बेशिस्तपणे येथे एमएमआरडीएकडून मेट्रोचे काम सुरु करण्यात आले आहे. मी पाहणी केली त्यावेळीच सांगितले होते की, येथे शंभर टक्के वाहतूक कोंडी होणार. अवजड वाहनांना अजूनही येथे बंदी घातली नाही. बॅरिकेट्स लावले आहेत त्याच्या बाजूला रस्ता सुटायला हवा ती लेन अद्याप बनवून पूर्ण झालेली नाही. शेतकऱ्यांना मोबदला न मिळाल्याने अजून या रस्त्याचे काम काही ठिकाणी रखडले आहे. रस्ता एमएमआरडीए, मेट्रो एमएमआरडीएची तरीही यांनी योग्य नियोजन केलेले नाही. मेट्रोच्या आधी रस्त्यावर डिव्हायडर, झाडी लावली, स्ट्रीट लाईटचे पोल लावले व आता काढून टाकले. ही सर्व जनतेच्या पैशाची नासाडी आहे. वाहन कोंडीमुळे शाळा बंद होणे ही लोकप्रतिनिधी म्हणून खर तर आमच्यासाठी लज्जास्पद गोष्ट आहे. ही गोष्ट घडू नये यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याशी संपर्क साधून त्यांना कल्पना दिली आहे. त्यांच्यासोबत तात्काळ मिटींग लावण्यात आली आहे. पर्यायी रस्ता काढल्याशिवाय काम चालू करु नये असे मी त्यांना सांगितले आहे. उद्याच्या बैठकीत यावर नक्कीच तोडगा काढला जाईल.

राजू पाटील, कल्याण ग्रामीण आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.