Vijay Wadettiwar: शिंदे समितीने ओबीसींमधील इतर वंचित जातींच्या नोंदी तपासाव्यात; वडेट्टीवारांची नवीन मागणी

Vijay Wadettiwar
Vijay Wadettiwarsakal
Updated on

Vijay Wadettiwar: मराठा आरक्षणावरुन आता मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद निर्माण झाला आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा विरोध केला. दरम्यान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याला विरोध दर्शवला आहे. तसेच शिंदे समितीने ओबीसींच्या नोंदी तपासाव्या अशी मागणी केली आहे. यामुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

आरक्षणाची टक्केवारी वाढवून मराठा समाजाला आरक्षण द्या, ओबीसींच्या आरक्षणा धक्का लावू नका. सरसकट आरक्षणाला आमचा विरोध आहे. शेतकऱ्यांच्या सर्वाधीक आत्महत्या विदर्भात होतात. ते ओबीसी आहेत. ओबीसी समाजाला सर्वकाही मिळते, अशी अफवा पसरवण्यात आली. तुम्ही (मराठा) येणार असाल तर आरक्षणाची टक्केवारी वाढवून घ्या, वेगळा प्रवर्ग घ्या, ओबीस आणि मराठा समाजाला दुखवू नका, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

Vijay Wadettiwar
world cup 2023: प्रसिद्ध अभिनेत्रीनं मोहम्मद शमीला आधी थेट लग्नाची मागणी घातली अन् आता..

विजय वडेट्टीवार म्हणाले, शिंदे समितीने कुणबी नोंदी तपासल्या त्याबरोबर ओबीसीतील सर्व वंचित जातीच्या नोंदी शोधाव्या आणि त्यासंदर्भात श्वेतपत्रिका जाहीर करावी. कुणबी नोंदी शोधत असताना ओबीसीतील अनेक जातींना लाभापासून वंचित राहावं लागत कारण त्यांना वेळेवर नोंदी सापडत नाहीत. ६७ चे पुरावे न मिळाल्यामुळे ओबीसींना लाभापासून वंचित राहावं लागतात.आम्हाला देखील प्रमाणपत्रासाठी भटकावं लागतं. (Latest Marathi News)

Vijay Wadettiwar
बिहारमध्ये फक्त सात टक्के लोक पदवीधर, तर सवर्णांपैकी २५ टक्के कुटुंबे गरीब; जातीय जनगणनेतून समोर आली आकडेवारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.