Devendra Fadanvis: पूर्ण बहुमत तरीही अजित पवारांना सरकारमध्ये का घेतलं? अखेर फडणवीसांनी दिलं उत्तर म्हणाले...

काय म्हणालेत देवेंद्र फडणवीस?
Devendra Fadanvis
Devendra FadanvisEsakal
Updated on

इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह मुंबईच्या दोन दिवसीय कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील सद्यस्थितीवर भाष्य केलं आहे. तर सत्तेत मित्रपक्ष असलेली शिवसेना ही आमची नैसर्गिक युती आहे तर अजित पवार आमचे राजकीय भागीदार आहेत, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.(Latest Marathi News)

पुढे फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आमच्यासोबत आल्यामुळे पक्षाची ताकद वाढली आहे. तसंच अजित पवारांनीही साथ दिल्यानं आमची ताकद वाढली आहे. पंतप्रधान मोदींमुळे आमची राजकीय केमिस्ट्री मजबूत आहे आणि अजित पवारांच्या येण्यामुळे राजकीय अंकगणितही बरोबर झाले आहे.

Devendra Fadanvis
Ajit Pawar : पालकमंत्रीपदांचा तिढा सुटला! पुण्याचे कारभारी अजितदादाच; तर चंद्रकांत पाटील...

2019 मध्ये राष्ट्रपती राजवटीची शरद पवार यांची कल्पना

फडणवीस म्हणाले की, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी 2019 मध्ये राष्ट्रपती राजवटीची कल्पना दिली होती. तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयाला मंजुरी दिली होती. (Marathi Tajya Batmya)

Devendra Fadanvis
Devendra Fadanvis: 2019च्या राष्ट्रपती राजवटीमागेही शरद पवारांचाच हात; फडणवीसांचा गौप्यस्फोट!

महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदलणार नाहीत

महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदलण्याच्या चर्चेवर फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदलणार नाहीत. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील. पीएम मोदी फॅक्टर राज्यात नेहमीच काम करतो आणि काम करेल. महाराष्ट्रात 40 पेक्षा जास्त जागा जिंकू. मी पक्षाचा कार्यकर्ता आहे, पक्ष सांगेल मी तेच करीन.(Latest Maharashtra News)

Devendra Fadanvis
धक्कादायक! स्वातंत्र्य सैनिकाच्या घराला करंट देऊन संपूर्ण कुटुंबाला ठार मारण्याचा प्रयत्न; सांगलीतील क्रूर प्रकाराने खळबळ

शिवसेनेने 4 जागांसाठी युती तोडली

आम्हाला 2014 ची निवडणूकही शिवसेनेसोबत लढवायची होती. शिवसेनेने 147 जागांवर लढावे, तर 120 जागांवर लढायचे होते. उरलेल्या जागा आम्ही आमच्या मित्रपक्षांना देऊ असे सांगितले होते. मात्र शिवसेनेने स्पष्टपणे सांगितले होते की, आम्ही १५१ पेक्षा कमी जागेवरही निवडणूक लढवणार नाही. केवळ चार जागांसाठी त्यांनी आमच्याशी युती तोडली. जेव्हा त्यांनी युती तोडली तेव्हा लोकांना आमच्या क्षमता कळल्या. आम्ही विश्वासघात करत नाही, पण जर आमच्याशी कोणी विश्वासघात केला तर आम्ही त्याला तसंच उत्तर देऊ, असंही फडणवीस म्हणाले आहेत.

Devendra Fadanvis
Kartiki Ekadashi: अजित पवार की देवेंद्र फडणवीस? कार्तिकी एकादशीला महापूजा मान कोणाला? मंदिर समितीसमोर मोठा पेच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.