पात्रता नसेल म्हणून मंत्रिपद दिले नाही; पंकजा मुंडेंच्या मनातील खदखद उघड

‘पात्रता नसेल म्हणून मला मंत्रिपद दिले नसेल. मात्र, जेव्हा वाटेल तेव्हा ते देतील,’ या भावना व्यक्त मांडत मुंडे यांनी पक्ष नेतृत्वावर निशाणाच साधला.
shinde fadanvis govt cabinet Expansion Pankaja Munde politics mumbai
shinde fadanvis govt cabinet Expansion Pankaja Munde politics mumbaiPankaja Munde
Updated on

मुंबई : ‘पात्रता नसेल म्हणून मला मंत्रिपद दिले नसेल. मात्र, जेव्हा वाटेल तेव्हा ते देतील,’ या भावना व्यक्त मांडत मुंडे यांनी पक्ष नेतृत्वावर निशाणाच साधला. मंत्रिमंडळ समावेशाबाबत माझे काही म्हणणे नसल्याचेही त्यांनी सांगितले. शिवसेनेच्या बंडखोरांसोबत राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर मंत्रिपदाची अपेक्षा ठेवलेल्या मात्र, पहिल्या विस्तारात मंत्रिपद न मिळालेल्या भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या मनातील नाराजी लपून राहिलेली नाही. शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात मुंडे यांना स्थान मिळण्याची चर्चा होती. मात्र, तसे झाले नाही. त्यामुळे आधी राज्यसभा, विधान परिषदेसाठी डावललेल्या मुंडे यांना मंत्रिमंडळात घेण्यात आलेले नाही.

त्यामुळे मुंडे समर्थकांच्या नाराजीत भर पडली आहे. विस्ताराबाबत दोन दिवस काही पंकजा मुंडे यांनी गप्प होत्या.आज राखीपौर्णिमेदिवशी त्यांनी मोजक्यात शब्दांत प्रतिक्रिया दिली. राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर हे राखी बांधण्यासाठी मुंडे यांच्याकडे आज आले होते. त्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी मुंडे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. त्यावेळी मंत्रिपद न मिळाल्याची खदखद स्पष्टपणे जाणवली.

राठोड यांच्याबद्दल काय बोलणार?

शिंदे गटातील आमदार संजय राठोड यांच्या मंत्रिपदाबाबत विचारले असता, ‘ज्यांनी त्यांना मंत्रिपद दिले आहे. त्यांनाच विचारा, मी काय बोलणार,’ अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.