आपल्या पाठीमागे पक्षाचे प्रमुख पवारसाहेबांची ताकद आहे. जो यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचार आहे, तोच विचार पवारसाहेबांचा आहे.
सातारा : राष्ट्रवादीचा (NCP) बालेकिल्ला अबाधित ठेवण्यासाठी पवारसाहेबांनी जनतेसाठी पुन्हा ८३ व्या वर्षी पायाला भिंगरी लावून कामाला सुरुवात केली आहे. पवारसाहेब (Sharad Pawar) नावाचं एक वादळ पुन्हा महाराष्ट्रात निर्माण होत आहे, असं प्रतिपादन आमदार शशिकांत शिंदे यांनी केलं.
पवारसाहेब नावाच्या या वादळात हे तीन चाकी सरकार कोलमडल्याशिवाय राहणार नाही. आपली लढाई ही हुकूमशाहीच्या विरोधात असून, जे-जे आडवे येतील, त्यांना बाजूला करून नव्याने मोट बांधूया, असं आवाहनही आमदार शिंदे (Shashikant Shinde) यांनी केलं.
राष्ट्रवादी काँग्रेस भवनात गुरुवारी फ्रंटल सेलची आढावा बैठक आमदार शशिकांत शिंदेंच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी राष्ट्रवादीचे आयटी विभागाचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील, सत्यजितसिंह पाटणकर, जिल्हाध्यक्ष सुनील माने, रमेश उबाळे, महिला प्रदेश उपाध्यक्षा कविता म्हेत्रे, प्रदेश सरचिटणीस समिंद्रा जाधव, संजना जगदाळे, सतीश चव्हाण.
तसेच जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, राजाभाऊ शेलार, तेजस शिंदे, गोरखनाथ नलावडे, ॲड. वैभव मोरे, अतुल शिंदे, स्मिता देशमुख, ॲड. पूजा काळे, नलिनी जाधव आदी उपस्थित होते. आमदार शिंदे यांनी उपस्थित फ्रंटल सेलच्या सर्व पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली.
या वेळी शिंदे म्हणाले, ‘‘सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अबाधित राखण्यासाठी सर्वांनी जोमाने कामाला लागूया. साताऱ्याच्या राजधानीत छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून काम करूया. आपल्या पाठीमागे पक्षाचे प्रमुख पवारसाहेबांची ताकद आहे. जो यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचार आहे, तोच विचार पवारसाहेबांचा आहे.
विचारांचा वारसा जपतो, तोच राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. कार्यकर्त्याला आता काम करण्याची संधी आहे. आपली लढाई ही हुकूमशाहीच्या विरोधात आहे. या लढाई कोणी आडवे आले तर त्याला बाजूला सारून आपण आपली विचारधारात पुढे नेऊया.’’
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.