Rajan Vichare : माझ्या जीवाला काही बरं वाईट झाल्यास.., खासदाराचं पोलीस महासंचालकांना पत्र

खासदारांच्या अंगरक्षक पोलीस संरक्षणात कपात
Rajan Vichare : माझ्या जीवाला काही बरं वाईट झाल्यास.., खासदाराचं पोलीस महासंचालकांना पत्र
Updated on

माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील, असा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गटातील खासदार राजन विचारे यांनी केला आहे. (Shinde Fadnavis responsible if something bad happens to my life allegation of Rajan Vichare)

राजन विचारे यांनी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना पाठवलं आहे. आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा त्यांनी या पत्रातून केला आहे.

महाराष्ट्र शासनाने सूडबुद्धीने माझी सुरक्षा काढली आहे. मी रात्री-अपरात्री माझ्या मतदारसंघांमध्ये फिरत असतो. अशा वेळेस माझ्यासह कुठल्याही प्रकारची दुर्घटना घडल्यास हल्ला झाल्यास किंवा माझ्या कुटुंबियांना काही धोका निर्माण झाल्यास त्याला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जबाबदार असतील.

त्यामुळे मला पूर्वी जशी सुरक्षा होती तशाच प्रकारची सुरक्षा पुन्हा देण्यात यावी, अशी मागणी राजन विचारे यांनी पत्राद्वारे केली आहे. यापूर्वी देखील शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी माझ्या जीवाला धोका असल्याचे म्हटले होते.

काय म्हटले आहे पत्रात?

१३ ऑक्टोबर २०२२ रोजी आमच्या शिवसेना ठाणे जिल्हा शाखेच्या शिष्ठमंडळाने आपली भेठ गेऊन, महाराष्ट्र शासनाकडून व प्रशासनकाडून संपूर्ण ठाणे जिल्हातील पदाधिकाऱ्यांवर वर कार्यकर्त्यांवर सूडबुद्धीने तडीपार, प्रशोभक भाषण कलमाअंतर्ग गुन्हे, खोट्या केसेस, आक्षेपार्ह घोषणा दिल्याबद्दल गुन्हे अनेक कार्यकर्त्यांना टोसा तसेच शिंदे गटाकडून शाखा बळकावणे, वाचनालय बळकावणे, वर्षानुवर्षे आनंद चॅरिटेबल ट्रस्टमार्फत सुरु असल्ले्या दिवाळी पहाट कार्यक्रमाच्या जागावर हक्क सांगणे, पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना धमक्या देणे.

इत्यादी चिखावणीखोर प्रकार कथाकथीत स्वत:ला ठाणे जिल्हाप्रमुख समजणाऱ्या नरेश म्हस्के यांच्या निर्देशावरुन होत आहेत. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी शक्यता निर्माण झाली आहे. आम्ही आमच्याकडून संयम ठेवलेला.

अशा उपरोक्त परिस्थीततच माझा मतदारसंघ ठाणे, नवी मुंबई,मीरा भाईंदर इथपर्यंत पसरलेला आहे. या महापालिका मतदारसंघाचे क्षेत्रफळ मोठे असल्याने माला वारंवार रात्री अपरात्री मतदारसंघात जावून नागरीकांच्या समस्या सोडवाव्या लागतात.

त्यामुळेच मला २०१९ च्या ठाणे लोकसभा निवडणुकीत ७ लाख ४० हतार ९६९ मते मिळाली. परंतु शासनाने सूडबुद्धीने माझ्या अंगरक्षक पोलीस संरक्षणात कपात केलेली आहे. हा मला एक षडयंत्राचाच भाग वाटते.

आश्चर्य म्हणजे शिंदे गटातील ज्यांना शासकीय किंवा राजकीय उच्च पद नाहीत अशांनाही पोलीस संरक्षणत देण्यात आलेले आहे. माझे अंकरक्षक कपात केल्यामुळे माझ्या व कुटुंबियांच्या जिवीतेला धोका निर्माण झाला आहे.

दुर्देवाने अशी काही दुर्घटना झाल्यास त्यास महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री वर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार राहतील. तरी कृपता माझ्या अंतरक्षक पोलीस संरक्षणता वाढ करावी ही नम्र विनंती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.