Anganwadi Workers: शिंदे सरकारची नुसतीच घोषणा, अंमलबजावणी नाही; अंगणवाडी सेविका पुन्हा आझाद मैदानावर

Anganwadi workers will sit on hunger strike: २५ सप्टेंबरला राज्यातील अंगणवाड्या बंद ठेवून आझाद मैदान येथे कर्मचारी जेल भरो आंदोलनात सहभागी होणार आहेत.
Anganwadi Sevika
Anganwadi Sevika
Updated on

Mumbai News: वेतनवाढीची अंमलबजावणी रखडल्याने अंगणवाडी सेविकांनी उद्यापासून बेमुदत उपोषण करणार असल्याचं जाहीर केलं आहे. २५ सप्टेंबर रोजी जेल भरो आंदोलन करण्यात येणार आहे. उद्या सकाळी १० वाजता आझाद मैदानावर समितीमधील ७ घटक संघटनांचे २५ नेते बेमुदत उपोषणात सहभागी होणार असल्याची माहिती आहे.

नेत्यांना पाठिंबा देण्यासाठी रोज १५० अंगणवाडी कर्मचारी २४ तासांच्या साखळी उपोषणाला बसणार आहेत. २५ सप्टेंबरला राज्यातील अंगणवाड्या बंद ठेवून आझाद मैदान येथे कर्मचारी जेल भरो आंदोलनात सहभागी होणार आहेत.

Anganwadi Sevika
Solapur : अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात आक्रोश; मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावर बहिष्कार; सोमवारपासून उपोषण

राज्यभरातील अंगणवाडीसेविकांना ३ हजार, मदतनिसांना २ हजार वेतनवाढ देण्याचा निर्णय महिला व बालकल्याण विकास विभागाने घेतला होता. या निर्णयाला वित्तविभागाने वेतनवाढीच्या प्रस्तावाला मान्यताही दिली होती. मात्र, त्याची अद्याप अंमलबजावणी न झाल्याने महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती उपोषणाला बसणार आहेत.

Anganwadi Sevika
सव्वादहा लाख लाडक्या बहिणींचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी! आता अंगणवाडी सेविकांमार्फतच करता येतील अर्ज; वाचा, कोणत्या तालुक्यातून किती महिलांचे अर्ज

गिरणी कामगार देखील आंदोलन करणार

गिरणी कामगार घरांसाठी २६ सप्टेंबरपासून मुंबईत आंदोलन करणार आहेत. २६ सप्टेंबरपासून गिरणी कामगार संघर्ष समितीकडून भारतमाता, लालबाग येथे धरणे व निदर्शने केली जाणार आहेत, तर २ ऑक्टोबर रोजी गिरणगावात लाँग मार्च काढण्यात येणार आहे. मफतलाल मिलसमोर खटाव मिलची जमीन मिळावी, मफतलाल गिरणी न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सुरू करावी, घरासाठी जमीन मिळावी म्हणून मॅरेथॉन टॉवरसमोर निदर्शने करण्यात येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.