CM Eknath Shinde : शिंदे सरकार वयोवृद्धांना घडवणार अयोध्या वारी,लाडकी बहिण नंतर वयोवृद्ध ही होणार खुष

Mukhyamantri teerth darshan yojana : शिंदे सरकारने वयोवृद्धांना अयोध्याला मोफत वारी घडविण्याची "मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना" सुरू केली आहे. योजनेत जेवण, राहण्याची व्यवस्था आणि 70 वर्षांवरील लाभार्थ्यांना सहकारी सोबत नेण्याची मुभा देण्यात आली आहे.
Ayodhya, CM Eknath Shinde
CM Eknath Shindesakal
Updated on

मोखाडा : महायुती सरकार ने राज्यात ऑगस्ट महिन्यात " लाडकी बहिण " योजनेच्या अंमलबजावणीची सुरूवात केली आहे. दरमहा दिड हजार रुपये मिळाल्याने, राज्यातील लाभार्थी महिला खुष झाल्या आहेत.

आता वयोवृद्धांना खुष करण्यासाठी शिंदे सरकार ने " मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना " सुरू केली आहे. वयोवृद्धांना पुढच्या महिन्यात मोफत अयोध्या वारी घडविण्यात येणार आहे. त्यासाठी लाभार्थी गोळा करण्याच्या कामाला प्रशासन लागले आहे. 

लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर महायुती सरकार मधील सर्व च घटक पक्ष कामाला लागले आहेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी महायुती सरकार विविध योजना कार्यान्वित करू लागले आहेत. विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजु लागले आहेत. विधानसभा निवडणुकीत, लोकसभा निवडणुकीची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून महायुती सरकार ने " मुख्यमंत्री लाडकी बहिण " योजनेची, ऑगस्ट महिन्यात अंमलबजावणी सुरू केली आहे. राज्यातील करोडो महिलांना दिड हजार रुपये महिना मिळाल्याने त्या खुष झाल्या आहेत. 

महायुती सरकार ची  " मुख्यमंत्री लाडकी बहिण " योजना लोकप्रीय झाल्यानंतर, आता वयोवृद्धांना खुष करण्यासाठी " मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना "  आणली आहे. या योजनेंतर्गत  60  वर्षावरील नागरीकांना, ऑक्टोबर महिन्यात अयोध्या वारी घडविण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक तालुकास्तरावर समाज कल्याण विभाग आणि महिला व बाल विकास विभागाचे अधिकारी कामाला लागले आहेत.

गावपातळीवर अंगणवाडी सेविका तसेच महिला बचत गटांना वयोवृद्ध लाभार्थी शोधण्याची मोहीम सोपवण्यात आली आहे. ग्रामीण भागातील वयोवृद्ध नागरीक अयोध्येला जाण्यासाठी तयार होत नसल्याने, अंगणवाडी सेविकांची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री  लाडकी बहिण योजना जेव्हढी प्रभावी ठरली तेव्हढी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना यशस्वी होईल की नाही याबाबत शंका निर्माण झाली आहे. 

वयोवृद्ध लाभार्थ्यीना लागणारे कागदपत्रे व सुविधा.....

अयोध्या वारी साठी वयोवृद्ध लाभार्थ्यीना, पिवळे अथवा केशरी रेशन कार्ड, आधार कार्ड तसेच  2  लाख  50  हजार रुपयांच्या आत वार्षिक उत्पन्न आणि डाॅक्टरांकडील फिटनेस सर्टिफिकेट केवळ या अटी ठेवण्यात आल्या आहेत. अयोध्या दर्शन वारी साठी लाभार्थी वयोवृद्धांची जेवणाची व राहण्याची मोफत सोय करण्यात आली आहे. तसेच  70  वर्षावरील वयोवृद्धाला सोबत सहकारी घेण्याची मुभा देखील शासनाने दिली आहे.

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन तालुक्यातील वयोवृद्धांना करण्यात आले आहे. या योजनेंतर्गत वयोवृद्धांची जेवण तसेच राहण्यासाठी मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक तालुक्यातुन किमान  50  तर जास्तीत जास्त किती ही संख्येने, वयोवृद्ध या योजनेचा लाभ घेऊ शकतात. पुढच्या महिन्यात अयोध्या दर्शन साठी या योजनेंतर्गत आयोजन करण्यात आले आहे. तारीख मात्र, अजून वरिष्ठांकडुन कळविण्यात आलेली नाही. 

कुलदीप जाधव, प्रभारी गटविकास अधिकारी, मोखाडा. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.