Eknath Shinde: शिंदे गटाचे कार्यकर्ते परतीच्या मार्गावर? अनेक पदाधिकारी ठाकरे गटाच्या संपर्कात

Eknath Shinde
Eknath Shindeesakal
Updated on

अलिबाग: महाविकास आघाडीत अन्याय होत असल्याचा थयथयाट करत एकनाथ शिंदेच्या बंडात सहभागी झालेले रायगड जिल्ह्यातील हजारो कार्यकर्त्यांसह पदाधिकारी शिंदे गटात येण्यास इच्छुक आहेत.

काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात घडणाऱ्या घडामोडींचे थेट पडसाद जिल्ह्यातील राजकारणावरही पडले आहेत. राष्ट्रवादी सत्तेत भागीदार झाल्यानंतर भाजप समर्पित शिंदे गटाचे पदाधिकारी अस्‍वस्‍थ आहेत.

Eknath Shinde
अजित पवारांमुळे भाजपसह मित्र पक्षात नाराजी! उठाव केलेल्यांना विश्वासात घेणे गरजेचे; बच्चू कडू यांनी व्यक्त केली नाराजी

अनेकजण ठाकरे गटाच्या संपर्कात असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी परवानगी दिल्यास या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा केव्हाही पक्षात पुनर्प्रवेश करून घेऊ, असे सूचक वक्तव्य ठाकरें गटाचे जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांनी केले आहे.

ठाकरे गटाचे जिल्ह्यातील पदाधिकारी दोन दिवसांपासून तालुकानिहाय बैठका घेत आहेत. दरम्यान शिंदे गटाचे पदाधिकारी-कार्यकर्तेही बैठकीत सहभागी होत आहेत.

या सर्व पदाधिकाऱ्यांची मानसिकता परत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची आहे. जिल्ह्यातील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटात पुनर्प्रवेशाची इच्छा बोलून दाखवल्‍याचा दावा सुरेंद्र म्हात्रे यांनी केला आहे.

Eknath Shinde
Laxman Mane : 'RSS कडून फोडाफोडीचं राजकारण, त्या 9 आमदारांनी शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला'

सध्याच्या राजकीय परिस्थितीत शिंदे गटाच्या आमदारांमध्येही कमालीची अस्वस्थता आहे. अलिबागचे आमदार महेंद्र दळवी सोडून महाडचे आमदार भरत गोगावले, खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी ही नाराजी व्यक्त केली. त्यामुळे पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी वाढत आहे.

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी तयारी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना मतदारांची सहानुभूती हवी आहे. राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्यापूर्वी इच्छुक उमेदवार सुरक्षित राजकीय नेतृत्व शोधत असून शिवसेनेच्या मूळ नेतृत्वाकडे, ठाकरे गटाकडे आकर्षित झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.