Gulabrao Patil : "अजित पवारांनी पहाटेची चूक सुधारली! पण उद्धव ठाकरे..."

अजितदादांनी त्यांची चूक सुधारली, केजरीवाल यांनीही चूक सुधारली म्हणत ठाकरेंना लगावला टोला
Gulabrao Patil
Gulabrao PatilEsakal
Updated on

शिंदे गटाचे राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिवसेनेतून बंड करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि 40 आमदार बाहेर पडले. त्यांच्यासोबत मी पण होते. मी पक्षातून गेलो तेव्हा सांगूनच गेलो होतो. मी भगोडा नव्हतो असं गुलाबराव पाटील यांनी म्हंटलं आहे.

मी त्यांना सांगूनच बाहेर पडलो होतो, असं सांगतानाच गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही त्यांचे नाव न घेता निशाणा साधला आहे. ज्या प्रमाणे अजित पवार यांनी पहाटे पहाटे शपथ घेतली तरी त्यांची चूक त्यांनी दुरुस्त केली होती. दिल्लीत केजरीवाल यांचे आमदार फुटून गेले होते त्यांनी लगेच आपली चूक सुधारून पुन्हा त्यांची मनधरणी करून आपल्या बाजूला करण्यात यश मिळविले होते.

Gulabrao Patil
Eknath Shinde : CM शिंदेंनी राजकरणासह गाजवलं क्रिकेटचं मैदान, केली तुफान फटकेबाजी

तर सोरेन यांचेही काही आमदार पक्ष सोडून गेले होते त्यांनाही परत आणण्यात त्यांना यश मिळाले, या ठिकाणीही हे शक्य होते. मात्र या ठिकाणी ऐकण्याची मानसिकता नव्हती, उद्धव ठाकरे यांनी प्रयत्न न केल्याचा टोला गुलाबराव पाटील यांनी नाव न घेता लगावला आहे.

हे ही वाचा : आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

अजित पवार यांनी त्यांची चूक सुधारली, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही त्यांची चूक सुधारली. पण उद्धव ठाकरे यांनी सुधारली नाही. त्यांना ग ची बाधा नडली, असा टोला गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे. ज्या ताटात खाल्ले त्या ताटात वाईट करायची आपली संस्कृती नाही, मात्र योग्य वेळी आपण उत्तर देणार, असंही मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले आहेत.

Gulabrao Patil
Aurangabad News : विनयभंगाचा आरोपानंतर विशाल ढुमे यांच्यावर आयुक्तांकडून कारवाई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()