Shinde Vs Bjp : सेना - भाजप संघर्षाचा नवा अध्याय? शिंदेंच्या 'या' मंत्र्याने थेट भाजपलाच लगावला टोला

Latest Marathi News: १७ सप्टेंबरला मुख्यमंत्री शहरात येतील, त्यांच्या हस्ते भूमिपूजनाचा संकेत सत्तार यांनी दिले.
सेना - भाजप संघर्षाचा नवा अध्याय? शिंदेंच्या 'या' मंत्र्याने थेट भाजपलाच लगावला टोला
Shinde Vs Bjp : sakal
Updated on

Latest Sambhajinagar News: सिल्लोड मतदारसंघातून यावेळी मी एक लाख ४० हजार मतदारांनी निवडून येणार, असा दावा पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी गुरुवारी (ता. २९) केला. मी राजकारणातला जुना खेळाडू आहे. या क्षेत्रात आता एमडी, सर्जन झालो आहे. सिल्लोडमध्ये ३ लाख २० हजार हिंदू आणि ६० हजार मुस्लिम मतदार आहेत. २७ हजार बोगस मतदार घुसवले, असे सांगणाऱ्यांनी अभ्यास करावा, असा टोला त्यांनी नाव न घेता भाजपला लगावला.

टीव्ही सेंटर परिसरातील छत्रपती संभाजी महाराज साहसी पार्कच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. सत्तार पुढे म्हणाले, २५ वर्षांपासून मी सत्तेत आहे. जिकडे सत्ता तिकडे मी असतो. छत्रपती संभाजीनगरचा पालकमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी संधी दिली.

सेना - भाजप संघर्षाचा नवा अध्याय? शिंदेंच्या 'या' मंत्र्याने थेट भाजपलाच लगावला टोला
Shinde Vs Bjp: शिवसेनेच्या बालेकिल्ल्यावर भाजपचा डोळा, या मतदार संघावर केला दावा
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.