Shirdi Sai baba: साईबाबा संस्थानला बेनामी देणग्यांवर द्यावा लागणार नाही कर, कोर्टाचा निर्णय!

Bomday High Court on Shirdi Sai baba's tax on Domation: मोठा खर्च शैक्षणिक संस्था, रुग्णालये आणि वैद्यकीय सुविधांसाठी आहे, जे दर्शवते की ते केवळ धर्मादाय आहे
 शिर्डीचे श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट धर्मादाय आणि धार्मिक दोन्ही असल्याने,
Shirdi Saibaba Bomday High Courtsakal
Updated on

Latest Shirdi News: मुंबई उच्च न्यायालयाने शिर्डीच्या साईबाबा संस्थानला दिलासा दिला आहे. श्री साई बाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डी ही सेवाभावी आणि धार्मिक संस्था असल्याने त्यांच्या बेनामी देणग्यांवर प्राप्तिकरातून सूट मिळण्यास पात्र आहे, असे स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाने आज आयकर विभागाचे अपील फेटाळून लावले.

असंख्य भाविकांचे श्रद्धास्थांन असलेल्या शिर्डीच्या साईबाबा चरणी भाविक सढळ हस्ते दान देतात. या देणग्यांवर संस्थानाला आयकरातून सूट मिळण्यास पात्र असल्याचा निर्णयाला आक्षेप घेत आयकर विभागाने याचिका दाखल केली होती शिर्डीचे श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट धर्मादाय आणि धार्मिक दोन्ही असल्याने,

त्याच्या बेनामी देणग्यांवर आयकरातून सूट मिळण्यास पात्र आहे, असा निर्णय इन्कम टॅक्स अपिलेट ट्रिब्युनलने ऑक्टोबर २०२३ रोजी दिला होता. या निर्णयाला प्राप्तिकर विभागाने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले.

 शिर्डीचे श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट धर्मादाय आणि धार्मिक दोन्ही असल्याने,
Shirdi Saibaba: शिर्डीत केंद्राची सुरक्षा नकोच; ग्रामस्थ आक्रमक फडणवीसांकडे केली मोठी मागणी, वाचा प्रकरण

आयटी विभागाच्या म्हणण्यानुसार, ट्रस्टला २०१९ पर्यंत एकूण ४०० कोटी रुपयांपेक्षा जास्त देणग्या मिळाल्या, परंतु केवळ दोन कोटी तीस लाख रुपये धार्मिक कारणांसाठी खर्च केले गेले, तर मोठा खर्च शैक्षणिक संस्था, रुग्णालये आणि वैद्यकीय सुविधांसाठी आहे, जे दर्शवते की ते केवळ धर्मादाय आहे. ट्रस्टने असा दावा केला आहे की त्याच्याकडे धर्मादाय आणि धार्मिक दोन्ही जबाबदाऱ्या आहेत आणि म्हणूनच ते धर्मादाय किंवा धार्मिक ट्रस्ट आहे, असे म्हणता येणार नाही.

 शिर्डीचे श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट धर्मादाय आणि धार्मिक दोन्ही असल्याने,
Shirdi Saibaba : बदलत्या हवामानाचा साईनगरीला फटका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.