Shirur Loksabha 2024 : शिरुरमध्ये आढळराव 'अढळ' ठरतील? की कोल्हेंचं 'मोल' 'अमोल' ठरेल? मतदारसंघाचा इतिहास जाणून घ्या...

Shirur Loksabha 2024 : शिवाजीराव आढळराव पाटील म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा गड मानला जाणाऱ्या पुण्यात शिवसेनेची ढाल बनून लढणारा नेता. आढळरावांनी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे दोन वेळा नेतृत्व केले आहे. २००९ आणि २०१४ ला आढळरावांनी राष्ट्रवादीला आसमान दाखवत.. ठाकरेंना शिरूरचा गड राखून दाखवला.
Shirur Loksabha 2024
Shirur Loksabha 2024esakal
Updated on

Shirur Loksabha 2024 : शिवाजीराव आढळराव पाटील म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा गड मानला जाणाऱ्या पुण्यात शिवसेनेची ढाल बनून लढणारा नेता. आढळरावांनी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे दोन वेळा नेतृत्व केले आहे. २००९ आणि २०१४ ला आढळरावांनी राष्ट्रवादीला आसमान दाखवत.. ठाकरेंना शिरूरचा गड राखून दाखवला. जनतेशी नाळ आणि मतदारांशी असणारा जनसंपर्क या आढळरावांच्या जमेच्या बाजू. जनतेच्या सुख-दु:खात सामील होणारा नेता म्हणून त्यांना नावलौकिक आहे. पण या शिवसेनच्या गडाला शिवसेतूनच निवडणुकांच्या तोंडावर जय महाराष्ट्र करणाऱ्या अमोल कोल्हेंनी सुरूंग लावला आणि शिरूरची जागा पवारांच्या राष्ट्रवादीला निवडून दिली.

आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. महाराष्ट्राचं राजकारण १८० अंशाच्या कोणात बदललं आहे. पण तरीही शिरूरची जागा ही प्रतिष्ठेची झाली ती अजित पवार आणि खुद्द आढळरावांमुळे.. काय आहे शिरूरचा इतिहास आणि २०२४ ला राजकारण कसं असेल जाणून घेऊया..

आढळरावांच्या रूपाने शिवसेना पुणे विभागात आपलं ठाण मांडून होती. त्यात भर पडली ती मावळची. शिरूरचे खासदार हे ही एकेकाळचे शिवसैनिक. शिरूरची जागा शरद पवारांनी अनेक प्रयत्न करूनही राष्ट्रवादीकडे येत नव्हती. आढळरांवाना शिरूरमधून हरवणं अशक्य मानलं जाण्याचा तो काळ.

पण पवारांनी २०१९ ला आपला हुकमी डाव टाकला आणि अमोल कोल्हेंना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देत. शिरूर लोकसभेसाठी उतरवलं. तसे पाहायला गेलं तर शिरूरचा सामना हा पारंपारिक राष्ट्रवादी विरूद्ध शिवसेना असाच. आधी निकम मग लांडे आढळरावांसमोर कोणाचाचं टिकाव लागत नव्हता.

Shirur Loksabha 2024
Mahadev Jankar Joined Mahayuti : जानकरांचं पुन्हा महायुतीसोबत सूत जुळलं! मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत झाला निर्णय

पण अमोल कोल्हेंचा चेहरा आणि राष्ट्रवादीची ताकद वापरून शरद पवारांनी २०१९ ला अमोल कोल्हेंसाठी सर्व यंत्रणा पणाला लावली. आणि अमोल कोल्हेंनी शिवसेनेच्या गडाला सुरूंग लावत. शिरूरमध्ये बाजी मारली. अमोल कोल्हेंच्या विजयात महत्त्वाची भूमिका होती ती अजित पवारांची. निवडणुकांचा प्रचंड अनुभव आणि कार्यकर्त्यांची ताकद देत अजित पवारांनी अमोल कोल्हेंसाठी जीवाचं रान केलं.

पण पुढे जाऊन, राष्ट्रवादी पक्षात फुट पडली आणि अजित पवारांनी अमोल कोल्हेंना पाडण्याचा चंग बांधला. अजित पवारांनी २०२४ची लोकसभा आता प्रतिष्ठेची केली आहे. अमोल कोल्हे राजीनामा देण्याच्या विचारात होते म्हणत अजित पवारांनी प्रचाराला सुरूवात केली पण त्यांच्या विरोधात कोण? हा मोठा प्रश्न अजित पवारांसमोर होता.

अमोल कोल्हे विरूद्ध दिलीप वळसे पाटील असा सामना होणार असं वाटत असताना आढळरावांनी बाण नसेल तर घड्याळही चालेल असं सूचक विधान केलं. त्यानंतर शिरूरमध्ये भाकरी फिरणार का अशा चर्चा रंगू लागल्या.

आढळराव हे अजित पवारांचे कट्टर विरोधक म्हणून महाराष्ट्राला माहिती होते. पण राजकारणात कोण कोणाचा शत्रू नाही आणि कोण कोणाचा मित्र नाही हे आपण गेली ५ वर्ष अनुभवतोय. त्यामुळे २६ तारखेला आढळराव पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करणार आहेत.

एका बाजूला महाराष्ट्रात पक्ष फोडाफोडी आणि एकनिष्ठा या मुद्द्यावर निवडणुका होणार हे स्पष्ट असताना शिरूरमध्ये मात्र ‘बदला’ हा मुद्दा गेमचेंजर ठरणार आहे. अजित पवारांनी शिरूरमधून अमोल कोल्हेंना चॅलेंज केलं आहे याचा अर्थ ते शरद पवारांना चॅलेंज आहे. अमोल कोल्हे आपल्या बाजूने राहतील असा विश्वास अजित पवारांना होतो पण कोल्हेंनी मोठ्या पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला.

Shirur Loksabha 2024
Sanju Samson RR vs LSG : संजू भाऊचा शॉट एकदम कडक! बॅटफूटवरून ठोकला मिडऑफला षटकार, VIDEO व्हायरल

तेव्हा पासूनच अजित पवारांनी शिरूरची जागा प्रतिष्ठेची केली आहे. नवा उमेदवार देण्यापेक्षा ज्यांना २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पाडण्यामध्ये मोलाची भूमिका बजावणाऱ्या अजित पवारांनी आढळरावांनाच आपल्या पक्षाकडून उमेदवार म्हणून पुढे आणले आहे. शिरूरची लढत अजित पवार विरूद्ध शरद पवार होणार असं चित्र असताना, आढळरावांमुळे निवडणुकीचा मुद्दाच बदलणार आहे.

२०१९ चा पराभव जिव्हारी लागलेले आढळरावांच्या मनात बदल्याची आग चांगलीच धगधगती आहे. हे त्यांच्या घड्याळासाठी अनुकूल असण्यावरूनच समजते. एकनाथ शिंदें ही शिरूरची जागा राष्ट्रवादीला सोडण्यासाठी तयार असल्याचे कळत आहे. अमोल कोल्हेंची प्रसिद्धी पाहता त्यांच्यासमोर आढळरावा हेच तुल्यबळ उमेदवार आहेत. जनसंपर्क नसणे मतदारसंघात न दिसणे हे आरोप अमोल कोल्हेंवर सतत होत आहेत. तर दुसऱ्याबाजूला जनसंपर्क हा आढळरावांची जमेची बाजू आहे. त्यामुळे शिरूरचा सामना अटीतटीचा होणार हे नक्की.

शिरूर लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, भोसरी आणि हडपसर. आमदारांबाबात बोलायचे झाल्यास महायुती येथे भक्कम आहे. शिरूरचे आमदार अशोक पवार सोडता सगळे ४ आमदार हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आहेत तर भोसरी यथून महेश लांडगे हे भाजपचे आमदार आहेत. सगळे आमदार हे जनतेत असणारे आहेत. त्यांच्या शब्दाला मतदारसंघात मान आहे. मतदान फिरवण्याची ताकद आहे, त्यामध्ये भरीला आता आढळरावांचा अनुभव आणि दांडगा जनसंपर्क या बाबी अमोल कोल्हेंचे टेन्शन वाढवणाऱ्या आहेत.

पण अमोल कोल्हे हे काय कच्चे खिलाडी नाहीत. शरद पवारांचा असणारा भक्कम पाठिंबा आणि लोकप्रियता, त्यासोबत क्लिन रेकॉर्ड आणि गाजणारी भाषणं. अमोल कोल्हेंसाठी निवडणूक सोप्पी करू शकतात.

शरद पवारांना मानणारा वर्ग, त्यांच्या हक्काचा मतदार आणि कांदा प्रश्नी अमोल कोल्हेंनी घेतलेली भूमिका यामुळे अमोल कोल्हे आढळरावांच्या 'बदले की आग'सोबत तग धरूर उभे राहतील का? हाच प्रश्न आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.