Amol Kolhe : ''अजितदादांनी जे सांगितलं ते शंभर टक्के खरं'', विलास लांडे थेटच बोलले

शिरुर लोकसभा मतदारसंघाचा वाद पुन्हा पेटला आहे. रविवारी शरद पवारांवर टीका केल्यानंतर अजित पवारांचा मोर्चा सोमवारी अमोल कोल्हेंच्या मतदारसंघात वळला.
Amol Kolhe
Amol Kolheesakal
Updated on

मुंबईः शिरुर लोकसभा मतदारसंघाचा वाद पुन्हा पेटला आहे. रविवारी शरद पवारांवर टीका केल्यानंतर अजित पवारांचा मोर्चा सोमवारी अमोल कोल्हेंच्या मतदारसंघात वळला. अमोल कोल्हेंविषयी बोलताना त्यांनी शिरुर मतदारसंघात उमेदवार उभा करुन त्याला निवडून आणणार असल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर अजित पवार गटाचे नेते आणि लोकसभेसाठी इच्छूक उमेदवार विलास लांडे यांनी कोल्हेंवर टीका केली.

अजित पवार काय म्हणाले?

अमोल कोल्हे यांचं थेट नाव न घेता अजित पवारांनी भाष्य केलं. ते म्हणाले की, एका खासदाराला निवडून आणण्यासाठी मी आणि वळसे पाटलांनी प्रयत्न केले होते. आता त्यांच्या विरोधातला उमेदवार निवडून आणणार आहे. दीड वर्षापूर्वी माझ्याकडे 'ते' खासदार आले आणि मला राजीनामा द्यायचा आहे, असं म्हटलं. त्यांना मीच उमेदवारी दिली होती. मी आणि दिलीप वळसे पाटलांनी त्यांच्यासाठी जिवाचं रान केलं होतं.

Amol Kolhe
Shubham Dubey: किटसाठी पैसे नव्हते, आता कोट्यवधीचा धनी! आयपीएलमधील जॅकपॉटने बदलणार क्रिकेटपटू शुभम दुबेचे आयुष्य

पवार पुढे म्हणाले, मधल्या काळात सहाही विधानसभा मतदारसंघात ते फिरत नव्हते. मी बोलणार नव्हतो. परंतु आता निवडणुका जवळ येऊ लागल्याने ते कामाला लागले आहेत. आम्हाला वाटलं होतं वक्ते चांगले आहेत, उत्तम कलाकार आहेत, संभाजी महाराजांची भूमिका उत्तमपणे निभावली होती.. खिळवून ठेवण्याचं काम केलं होतं त्यांनी. परंतु आता तिथं दिलेला उमेदवार निवडूनच आणून दाखवणार आहे.

अमोल कोल्हेंचं प्रत्युत्तर

जेव्हा चांगलं काम केलं तेव्हा अजितदादांनीच पाठीवर शाबासकीची थाप दिली आहे. आज त्यांनी विरोधात विधान केलं असेल तर लगेच प्रतिक्रिया देण्याएवढा मी मोठा नेता नाहीये. पाच वर्षातील माझ्या प्रेझेंन्सविषयी भाष्य केलं असेल तर त्यांनाच कान धरण्याचा अधिकार होता. नक्कीच सुधारणा केली असती. यापुढच्या काळात नक्कीच सुधारणा करेल. आता जनता ठरवेल सत्तेच्या बाजूने रहायचं की तत्व आणि मूल्याच्या बाजूने रहायचं.

Amol Kolhe
NewsClick प्रकरणाला नवे वळण; HR विभागाचे प्रमुख सरकारी साक्षीदार होण्यास तयार

विलास लांडेंना तिकिटाची अपेक्षा

अजित पवार गटाचे नेते विलास लांडे हे शिरुर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढणार असल्याचं मागच्या काही दिवसांपासून बोललं जात आहे. त्यांनी यापूर्वी तशी इच्छा जाहीर केली होती. सोमवारी पुन्हा ते बोलले. ''अजितदादांनी जे सांगितलं, ते शब्द कार्यकर्ते शंभर टक्के खरा करतील. मीसुद्धा दादांशी चर्चा करणार आहे. दादांनी संधी दिली तर नक्कीच खासदारकी लढवायला आवडेल.'' असं लांडे म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()