Sudhir Mungantiwar: ज्या आग्र्याच्या किल्ल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबासमोर बाणेदारपणे दरबार त्यागला होता. त्याच आग्र्याच्या किल्ल्ल्यात आणि 'दिवाण-ए-खास'मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होणार आहे. केंद्र सरकार यासाठी अनुकूल आहे.
आग्रा येथे शिवजयंती साजरी करण्यासाठी कायमस्वरुपी परवानगी द्यावी, अशी मागणी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्राकडे केली होती. तसा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला होता. ‘दिवाण-ए-खास’मधील आयोजनासाठी केंद्र सरकारचा सकारात्मक प्रतिसाद आहे. केवळ केंद्रीय पुरातत्त्व खात्याच्या अंतिम निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
पुरातत्त्व खात्याची परवानगी मिळाल्यास आग्रा येथे मोठ्या जल्लोषात आणि कायमस्वरुपी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होणार आहे. महाराष्ट्रासाठी ही मोठी अभिमानाची बाब ठरणार आहे. औरंगजेबाने शिवरायांना भेटीसाठी बोलावल्यानंतर आग्र्याच्या किल्ल्यामध्ये जो प्रसंग घडला तो ऐतिहासिक आहे. त्यानंतर महाराजांची नजरकैद आणि आग्र्यातून निसटणे; सगळंच रोमांचक आणि अंगावर शहारे आणणारं आहे. त्यामुळे आग्र्यातील शिवजयंतीच्या निर्णयाकडे सर्वांचंच विशेष लक्ष आहे.
राज्याचे सांस्कृतिक धोरण लवकरच जाहीर करणार- मुनगंटीवार
राज्याचे सांस्कृतिक धोरण हे सर्वसमावेशक असण्यावर भर देण्यात येत असून राज्याची संस्कृती, येथील पर्यटन, कारागिरी, गड-किल्ले यांचे संवर्धन आणि विविध लोककला, नृत्य, संगीत यांना या धोरणाच्या माध्यमातून प्रोत्साहन मिळेल. लवकरच या धोरणास राज्य मंत्रिमंडळात मंजुरी मिळेल, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
सांस्कृतिक धोरण 2010 पुनर्विलोकन समितीने दिलेल्या अहवालाच्या अनुषंगाने सह्याद्री अतिथीगृह येथे सांस्कृतिक कार्य मंत्री मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. या धोरण समितीचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे, विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, उपसचिव नंदा राऊत, सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे, पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाचे संचालक सुजितकुमार उगले आदी यावेळी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.