Shiv Jayanti : महाराष्ट्राला आर्थिकदृष्ट्या भक्कम बनवलं ते शिवरायांनी, जाणून घ्या छत्रपतींची अर्थव्यवस्था

स्वराज्याची बांधणी करताना भक्कम अर्थव्यवस्था उभारण्याचे अलौकिक कार्यही शिवाजी महाराजांनी पार पाडले.
Shiv Jayanti
Shiv Jayanti sakal
Updated on

सध्या महाराष्ट्रात शिवजयंतीचा जल्लोष पहायला मिळतोय. शिवजयंती ही शिवप्रेमींसाठी खूप मोठा सण असतो. शिवरायांनी रयतेच्या कल्याणासाठी संपुर्ण आयुष्य वेचले. मराठा साम्राज्य भक्कमपणे उभं केलं. स्वराज्याची बांधणी करताना भक्कम अर्थव्यवस्था उभारण्याचे अलौकिक कार्यही शिवाजी महाराजांनी पार पाडले.

त्यांच्या मृत्यूसमयी खजिन्यामध्ये किती दौलत होती याची यादीच सभासदाने व इतर बखरकारांनी दिलेली आहे. (Shiv Jayanti Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti how shivaji maharaj made economy strong read story

महसूलाचे उत्पन्न हे सर्वात मोठे उत्पन होते. स्वराज्यातील जमिनीची मोजणी करून त्यावर सारा निश्चित करण्याचे कार्य शिवाजी महाराजांनी अण्णाजी दत्तो यांच्याकडे सोपविले.

जमीन मोजणीसाठी पगारी अधिकारी नेमले होते. जमिनीची प्रथम प्रतवारी ठरवून त्या जमिनीतून येणाऱ्या पिकाचा अंदाज घेतला जात असे. त्यावर शेतसारा ठरविण्यात येत असे. या पद्धतीला "अण्णाजी पंताची धारा असे नाव मिळाले होते. शेती व्यवसायाला उत्तेजन देऊन पडीक जमिनी लागवडीखाली आणण्यासाठी शिवाजी महाराजांनी प्रोत्साहन दिले.

गरीब शेतकऱ्यांना नांगर, बैल आणि बी-बियाणे पुरविण्याच्या आज्ञा शिवाजी महाराजांनी आपल्या अधिकाऱ्यांना केलेल्या होत्या. दुष्काळाच्या प्रसंगी शेतकऱ्यांना सारा माफ केला जात असे.

राज्याच्या उत्पन्नाचे दुसरे महत्त्वाचे साधन म्हणजे चौथाई, सरदेशमुखी ही साधने शिवपूर्वकालापासूनच अस्तित्वात होती. सरहद्दीवरच्या दुबळ्या राज्यकर्त्यांकडून त्यांच्या उत्पन्नाचा चौथा हिस्सा वसूल करून घेणे म्हणजे चौथाई होय. या चौथाईच्या मोबदल्यात दुर्बल राज्यकर्त्यांना सुरक्षितता लाभत असे आणि या सुरक्षिततेपायी छोटे राज्यकर्ते स्वखुषीने चौथाई देण्यास तयार असत. शिवाजी महाराजांनी चौथाई पद्धतीचा पुरस्कार करून राज्याचे उत्पन्न वाढविले. चौथाईप्रमाणे दुसरे साधन म्हणजे सरदेशमुखी होय.

सुभ्यातील एकूण उत्पन्नाच्या १/१० भागाला सरदेशमुखी असे म्हणत. शिवाजी महाराजांच्या काळात कोकणामध्ये अनेक सरदेशमुख होते. महसूल गोळा करण्याचा मोबदला म्हणून १/१० भाग ते आपल्याकडे ठेवत असत. स्वराज्याची स्थापना आणि विस्तार झाल्यानंतर सरदेशमुखीचे अधिकार शिवाजी महाराजांनी स्वतःकडे घेतले. त्यामुळे स्वराज्याच्या उत्पन्नामध्ये भर पडली.

Shiv Jayanti
Shiv Jayanti 2023 : आग्र्याच्या लाल किल्ल्यात शिवजयंती साजरी करण्याचा मार्ग मोकळा

याशिवाय वेगवेगळ्या प्रकारचे कर म्हणजे उत्पन्नाची साधनेच होती करांमध्ये प्रत्यक्ष कर व अप्रत्यक्ष कर असे दोन प्रकार होते. शिवाय प्रासंगिक कर बसविण्याचा अधिकारही महाराजांनी राखून ठेवला होता. इनामपट्टी, मिरासपट्टी, देशमुखपट्टी यासारखे कर प्रत्यक्ष कर होते. अप्रत्यक्ष करामध्ये चुंगी, वांगी, फसकी, पळकी, उरीदलाली, सेवाधारा यासारखे कितीतरी कर होते. धान्य, फळफळावळ, कापडचोपड, गुरेढोरे यांच्या विक्रीवरही कर लादलेले होते. मिठावरही कर होता. वेगवेगळया प्रकारचे व्यवसाय करणाऱ्या लोकांवर आणि कारागीरांवरही कर होते.

वीणकराला मागपट्टी, चांभाराला पायपोशी तर तेल्याला तेलपट्टी याप्रकारचे कर द्यावे लागत, बलुतेदारांना कारूक नावाचा कर द्यावा लागत असे. करांचे ओझे गरिबांवर पडू नये याची काळजी घेतली जात असे. राज्याभिषेक प्रसंगी सिंहासनपट्टी नावाचा प्रासंगिक कर महाराजांनी बसविलेला आढळतो. करामुळे स्वराज्याचे उत्पन्न वाढत असे. म्हणून कर देणाऱ्या व्यक्तींच्या अडीअडचणींचाही विचार केला जात असे.

उदा. दुष्काळाचे वर्ष असेल किंवा शत्रूच्या स्वारीमुळे मुलुख, उध्वस्त झाला असेल तर कर माफ केले जात. शेतकऱ्यांप्रमाणे स्वराज्यातील व्यापारी वर्गही संपन्न असला पाहिजे, त्यांच्या व्यापाराला विस्तारित क्षेत्र मिळाले पाहिजे याकडेही महाराजांचे विशेष लक्ष असे.

बारदेशातील मीठ तेथील व्यापारी स्वराज्यात कमी दराने विकत असत. त्यामुळे स्वराज्यातील मीठाचा व्यापार बुडू लागला तेव्हा या शिवाय प्रासंगिक कर बसविण्याचा अधिकारही महाराजांनी राखून ठेवला होता. इनामपट्टी, मिरासपट्टी, देशमुखपट्टी यासारखे कर प्रत्यक्ष कर होते. अप्रत्यक्ष करामध्ये चुंगी, वांगी, फसकी, पळकी, उरीदलाली, सेवाधारा यासारखे कितीतरी कर होते. धान्य, फळफळावळ, कापडचोपड, गुरेढोरे यांच्या विक्रीवरही कर लादलेले होते.

मिठावरही कर होता. वेगवेगळया प्रकारचे व्यवसाय करणाऱ्या लोकांवर आणि कारागीरांवरही कर होते. वीणकराला मागपट्टी, चांभाराला पायपोशी तर तेल्याला तेलपट्टी याप्रकारचे कर द्यावे लागत. बलुतेदारांना कारूक नावाचा कर द्यावा लागत असे.

करांचे ओझे गरिबांवर पडू नये याची काळजी घेतली जात असे. राज्याभिषेक प्रसंगी सिंहासनपट्टी नावाचा प्रासंगिक कर महाराजांनी बसविलेला आढळतो. करामुळे स्वराज्याचे उत्पन्न वाढत असे. म्हणून कर देणाऱ्या व्यक्तींच्या अडीअडचणींचाही विचार केला जात असे.

Shiv Jayanti
Shiv Jayanti 2023 : अमेरिकेत पुन्हा छत्रपतींचा पुतळा पुन्हा बसवा

उदा. दुष्काळाचे वर्ष असेल किंवा शत्रूंच्या स्वारीमुळे मुलुख, उध्वस्त झाला असेल तर कर माफ केले जात. शेतकऱ्यांप्रमाणे स्वराज्यातील व्यापारी वर्गही संपन्न असला पाहिजे, त्यांच्या व्यापाराला विस्तारित क्षेत्र मिळाले पाहिजे याकडेही महाराजांचे विशेष लक्ष असे. बारदेशातील मीठ तेथील व्यापारी स्वराज्यात कमी दराने विकत असत.

त्यामुळे स्वराज्यातील मीठाचा व्यापार बुडू लागला तेव्हा या व्यापाराला संरक्षण देण्यासाठी बारदेशी मिठावर महाराजांनी जबरदस्त आयातकर बसविला. त्यामुळे स्वराज्यातील व्यापाऱ्यांचे मीठ चांगले खपू लागले व हा व्यापार उर्जितावस्थेत आला. अशाप्रकारे व्यापाराच्या उत्कर्षाबाबत शिवाजी महाराज प्रयत्नशील असले तरी व्यापार हा सचोटीचा असला पाहिजे त्यामध्ये ग्राहकांची लुबाडणूक होता कामा नये याकडेही त्यांचे लक्ष होते.

कोकणात नारळ, सुपारीच्या व्यापारामध्ये काही भ्रष्टाचार झाल्याचे आढळल्याने शिवाजी महाराजांनी सुभेदाराची कानउघाडणी केली होती.

उत्पन्नाचा मोठा भाग संरक्षण व्यवस्थेवर खर्च केला जात असे. किल्ले बांधणे, दुरुस्त करणे, आरमार वाढविण, युद्ध साहित्याची खरेदी करणे यावर बराच खर्च केला जात असे. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी पाटबंधारे बांधणे गरीब शेतकऱ्यांना बैल, नांगर, बी-बियाणे पुरवणे, गरजू शेतकऱ्यांना कर्जे देणे. मर्दमकी गाजविणाऱ्या सैनिकांना बक्षिसे देणे यावरही खर्च केला जात असे.

Shiv Jayanti
Shiv Jayanti 2023 : शिवजन्मोत्सवाचा ‘नाशिकरोड पॅटर्न’ राज्यात हीट! सर्वपक्षीय नेत्यांची एकता

आरमार वाढविण, युद्ध साहित्याची खरेदी करणे यावर बराच खर्च केला जात असे. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी पाटबंधारे बांधणे गरीब शेतकऱ्यांना बैल, नांगर, बी-बियाणे पुरवणे, गरजू शेतकऱ्यांना कर्जे देणे, मर्दुमकी गाजविणाऱ्या सैनिकांना बक्षिसे देणे यावरही खर्च केला जात असे.

स्वराज्याच्या आर्थिक उत्पन्नाची अनेकविध साधने महाराजांनी निर्माण केली असली तरी तिजोरीवरचा ताण सारखा वाढत रहात असे. त्याचे कारण म्हणजे महाराजांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केले होते. ते निर्माण करीत असताना आदिलशहा, मुघल यासारख्या बलाढ्य शत्रूबरोबर सातत्याने संघर्ष करावा लागत असे.

किल्लेबांधणीवर, लष्करावर, हत्यारांच्या खरेदीवर बराच खर्च करावा लागत असे. त्यामुळे राज्याचे उत्पन्न अपुरे पडत असे. अशा वेळी मुघल प्रदेशातील सधन शहरावर स्वारी करून लूट करणे, तसेच केवळ पैशाच्या लोभाने किनारपट्टीवर वखार टाकणाऱ्या पाश्चात्यांच्या वखारींची लूट करणे हे उपाय शिवाजी महाराजांनी अंमलात आणलेले होते.

सुरतेची त्यांनी दोन वेळा लूट केली. तसेच राजापूर, धरणगाव, हुबळी इत्यादी ठिकाणी बखारीवर हल्ले केले.

Shiv Jayanti
Shivaji Maharaj: 'शिवरायांच्या स्वराज्याचा अंत पेशवा ब्राह्मणांनी केला', पुस्तकावर बंदीची मागणी

व्यापारी पेठा लुटल्या. त्यामागे स्वराज्याचे उत्पन्न वाढविणे आणि शत्रूंना दहशत बसविणे असा दुहेरी हेतू शिवाजी महाराजांनी साध्य केला होता. राज्याभिषेक प्रसंगी शिवराई नावाचे चलन महाराजांनी सुरू केले. त्याशिवाय सोन्याचे होनही सिंहासनारूढ झाल्यानंतर सुरू केले. याशिवाय विजयनगरपासून बहमनी मुघल सत्तेपर्यंत सर्वांची नाणी स्वराज्यामध्ये व्यवहारासाठी होती.

(संदर्भ - महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ तर्फे प्रकाशित 'छत्रपती शिवाजी महाराज' पुस्तक, लेखक - प्र. न. देशपांडे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.