छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती. हा एक सोहळा म्हणून आपण साजरा करतो. प्रत्येक मराठी माणसासाठी हिच दिवाशी अन् हाच दसरा होय. राज्यभर आज महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार इंग्लंडच्या राणीच्या वयक्तिक संग्रहालयात म्हणजे रॉयल संग्रहालयात आहे. कोल्हापुरातून डिसेंबर जानेवारी 1875-76 दरम्यान लंडनचे राजपुत्र प्रिन्स ऑफ वेल्स भारतभेटीला आले होते. हेच प्रिन्स पुढे जाऊन 7वे एडवर्ड राजे म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांना ऐतिहासिक गोष्टी गोळा करण्याचा वेगळाच छंद होता.
प्रिन्स यांनी भारतात येण्यापूर्वी जवळपास 500 हुन अधिक संस्थानिकांकडे कोणकोणत्या ऐतिहासिक वस्तू आहेत याचा शोध घेतला. त्यावेळी त्याला असे आढळून आले की छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली जगदंबा नावाची तलवार ही करवीर छत्रपती घराण्याच्या संग्रहालयात आहे.
त्याकाळात कोल्हापूरच्या गादीवर चौथे शिवाजी महाराज जे केवळ 11 वर्षाचे होते ते विराजमान होते. तलवारीची अवस्था अशी होती की यातील हिरे माणिके पडलेली होती आणि त्याच म्यान देखील नव्हते. त्या सर्व गोष्टी दुरुस्त केल्या गेल्या.
यात हिरे बसवण्यात आले व म्यान देखील बनवून घेण्यात आली. हीच शिवाजी महाराजांची तलवार घेऊन 1875-76 ला चौथे शिवाजी महाराज मुंबई मध्ये गेले. प्रिन्स ऑफ वेल्स मुंबई मध्ये आल्यावर मोठा दरबार भरला. याच वेळी चौथे शिवाजी महाराज यांनी एक कट्यार आणि त्याजोडीला जगदंबा तलवार भेट म्हणून दिली. त्यानंतर तो प्रिन्स ती तलवार घेऊन गेला.
प्रिन्स ऑफ वेल्स ज्यावेळी तिकडे तलवार घेऊन गेला तेव्हा त्यांनी एक कॅटलॉग बनवला. हा कॅटलॉग त्यावेळीच छापलेला असून त्याची सध्याही उपलब्धता आहे. त्यातील 201 क्रमांकावर वर्णन केलेले आहे की ही तलवार कुठली आहे, कशी आहे, त्यावर काय लिहिलेले आहे, त्यावर हिरे किती आहेत, माणिक मोती किती आहेत, ही सर्व माहिती आहे.
काय होतं त्या कॅटलॉगमध्ये ‘ही तलवार कोल्हापूरच्या चौथ्या शिवाजी महाराजांनी प्रिन्स ऑफ वेल्सला भेट दिली. जी तलवार मराठा राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या वापरातील आणि त्यांच्या मालकीची होती. त्यांची आठवण म्हणून ही तलवार प्रिन्स ला भेट दिली.
मालब्रो हाऊसमध्ये त्याकाळी ही तलवार इंडियनरूम मध्ये होती. त्यानंतर रॉयल कलेक्शन ट्रस्ट नावाच्या ट्रस्ट स्थापनेनंतर त्यात ही तलवार गेली.
तिथले अधिकारी मात्र ही तलवार महाराजांची असल्याचे नाकारतात. मात्र, त्यांचा खोटेपणा तेच त्यांनीच बनवलेले कॅटलॉग उघडे पाडते. त्यांनीच तयार केलेल्या कॅटलॉगमध्ये ही तलवार शककर्ते शिवाजी महाराजांची आहे असे सांगितले आहे.
कोल्हापुरातील इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी लिहिलेले पुस्तक शोध भवानी तलवारीचा देखील आपल्याला हीच माहिती देते की ती जी तलवार आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांची आहे.
जगदंबा तलवार भारतात कशी येईल?
जगदंबा तलवार आपल्या देशात आपल्या राज्यात परत यावी अशी इच्छा खरं तर प्रत्येक मराठी माणसाची आहे. जे लोक मराठी नाहीत पण महाराजांना मानतात त्यांचीही अशीच इच्छा आहे. खरं तर हे एक स्वप्न आहे की आपल्या राजांची तलवार भारतात परत आली पाहिजे. ती कशी परत येईल याबद्दल इतिहास संशोधक इंद्रजित सावंत सागंतात की, जगदंबा तलवार कोल्हापूरच्या शाही घराण्यातून लंडनला गेलीय. त्यामूळे यासाठी त्याच घराण्यातील छत्रपती संभाजी राजेंनी प्रयत्न केले तर ती तलवार परत भारतात येऊ शकते.
सात – आठ वर्ष आधी संभाजी राजे तसे म्हणालेही होते की ती तलवार परत आणण्यासाठी प्रयत्न करेन पण ती गोष्ट अद्याप घडली नाही. तरीही त्यांनी प्रयत्न केले तर जगदंबा तलवार भारतात नक्की परत येऊ शकेल.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.