छत्रपती शिवराय म्हणजे, मातृभूमीला लाभलेलं बहुमूल्य वरदान : उदयनराजे

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2022
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2022esakal
Updated on
Summary

केवळ महाराष्ट्र किंवा भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगभरात छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आदरानं घेतलं जातं.

सातारा : केवळ महाराष्ट्र किंवा भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगभरात छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आदरानं घेतलं जातं. अनेक विद्वान, तत्त्वज्ञ, इतिहासकार शिवाजी महाराजांवर अभ्यास करण्यासाठी भारतात येतात. आज 19 फेब्रुवारी रोजी विविध देशांमध्ये शिवाजी महाराजांची जयंती (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2022) साजरी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी आपली भावना व्यक्त करत शिवरायांना मानवंदना दिलीय.

खासदार उदयनराजेंनी आपल्या फेसबुक पेजवर एक पोस्ट शेअर करत लिहिलंय, छत्रपती शिवराय म्हणजे, मातृभूमीला लाभलेलं एक बहुमूल्य वरदान आहे. महाराजांनी पेटवलेली क्रांतीची मशाल पिढ्यानपिढ्या पुढं सरसावत आहे. एखाद्या झंझावाताप्रमाणं.. म्हणूनच, छत्रपती शिवाजी महाराज आजही सर्वांच्या श्वासात, मनात, हृदयात, जगण्यात वसतात, अशी भावना त्यांनी व्यक्त केलीय.

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2022
'मला पाडण्यासाठी राष्ट्रवादीने 22 नेते कोट्यवधींना विकत घेतले'

साताऱ्यात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज वृषालीराजे शिवाजीराजे भोसले (Vrushaliraje Shivajiraje Bhosale) आणि छत्रपती कौस्तुभ आदित्यराजे भोसले यांच्या हस्ते शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आज सकाळी अभिषेक घालण्यात आला. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी शिवप्रेमींनी पोवई नाक्यावर पहाटेपासूनच मोठी गर्दी केली होती. शिवजयंतीनिमित्त लावण्यात आलेल्या भगव्या पताकांनी शिवतीर्थ अवघा भगवामय दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.