Shiv Rajyabhishek 2023: 'शिवरायांनी कायम एकतेला महत्त्व दिलं', मोदींकडून राज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाली आहेत.
Shiv Rajyabhishek 2023
Shiv Rajyabhishek 2023Sakal
Updated on

Shiv Rajyabhishek 2023: छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल १ जूनपासून रायगड परिसरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

शुक्रवार २ जून रोजी सकाळी ८.३० वाजता सोहळ्याचा उद्घाटनाचा कार्यक्रम झाला. यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संदेशाचे प्रक्षेपण केले गेले आहे.

या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय संस्कृती मंत्री जी. किशन रेड्डी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री उदय सामंत, रायगड विकास प्राधिकरणचे अध्यक्ष संभाजी राजे छत्रपती तसेच इतर लोकप्रतिनिधी व मान्यवर मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित आहेत.

राज्याभिषेक सोहळ्यावर नरेंद्र मोदी म्हणाले...

शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा एक अद्भुत अध्याय आहे. यासंदर्भातल्या महान गाथा आपल्याला आजही प्रेरणा देतात.

राष्ट्रकल्याण आणि लोककल्याण या शासनव्यवस्थेची मूल तत्व होती. मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नमन करतो.

आज स्वराज्याची पहिली राजधानी रायगड किल्ल्याच्या प्रांगणात सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. महाराष्ट्रात हा दिवस उत्सवाप्रमाणे साजरा केला जात आहे. यासाठी मी महाराष्ट्र सरकारलाही शुभेच्छा देतो.

Shiv Rajyabhishek 2023
Shiv Rajyabhishek 2023 : मराठेशाहीच्या अस्तानंतर पूर्णतः दुर्लक्षित रायगडाचं पुढे काय झालं?

शिवाजी महाराजांनी स्वराज्य, धर्म, संस्कृती यांना धक्का पोहोचवणाऱ्यांना इशारा दिला. यामुळे जनतेत दृढ आत्मविश्वास वाढला.

कृषीविकास, महिला सबलीकरण, शासन-प्रशासनाची सामान्यांपर्यंतची पोहोच, त्यांचं काम, शासनप्रणाली, नीती या आजही तितक्याच लागू होऊ शकतात. शिवाजी महाराजांचे इतके पैलू आहेत, की कोणत्या ना कोणत्या रुपात त्यांचं जीवन आपल्याला प्रभावित करतं

शिवाजी महाराजांच्या न्यायप्रियतेनं अनेक पिढ्यांना प्रेरित केलं आहे. त्यांचं साहस, सामुद्रिक कौशल्य आणि शांतीपूर्ण राजनिती आजही आपल्यासाठी प्रेरणास्रोत आहे.

आपल्याला या गोष्टीचा गर्व आहे की जगाच्या अनेक देशात आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नीतीची चर्चा होते आणि त्यावर संशोधन होतं.

एक महिन्यापूर्वीच मॉरिशसमध्ये शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची स्थापना करण्यात आली. त्यांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षं पूर्ण होणं हीच एक प्रेरणादायी बाब आहे. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

Shiv Rajyabhishek 2023
Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.