Shiv Rajyabhishek 2023 : मराठेशाहीच्या अस्तानंतर पूर्णतः दुर्लक्षित रायगडाचं पुढे काय झालं?

शिवस्मारकाच्या जीर्णोद्धाराची परवानगी मागण्यात आली होती, मात्र ब्रिटीश सरकारने ती नाकारली.
Raigad
RaigadSakal
Updated on

स्वराज्याची राजधानी, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आणि शिवराय अनंतात विलिन झाले, या तीन कारणांसाठी रायगड महत्त्वाचा ठरतो. या गडावर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधीही आहे. त्यांचा सिंहासनारुढ पुतळाही आहे. यंदाच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त जाणून घ्या, या गडाची आणि शिवरायांच्या स्मारकाची कथा.

श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे माजी अध्यक्ष जगदीश कदम यांनी रायगड आणि तिथल्या शिवरायांच्या स्मारकाबद्दल लिहिलं आहे. त्यानुसार, १८१८ मध्ये मराठेशाहीच्या अस्तानंतर ब्रिटिश काळात रायगड पूर्णत: दुर्लक्षित होता. १८८३मध्ये जेम्स डग्लस नावाच्या इंग्रज गृहस्थाने रायगडावर जाऊन तेथील दुरवस्थेचे वर्णन लिहिले. त्यामुळे भारतीय समाजात अस्वस्थता पसरली. १८८५ मध्ये रावबहादुर जोशी, लोकमान्य टिळक, न्या. तेलंग, न्या. रानडे, न्या. कुंटे इत्यादी समाजधुरिणांनी पुण्याला एका सभेचे आयोजन करून त्यात समाधी जीर्णोद्धाच्या कार्याचे सूतोवाच करण्यात आले.

Raigad
Shiv Rajyabhishek 2023: छत्रपतींच्या मूर्तीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजन संपन्न, फडणवीस, उदयनराजे,राज ठाकरे उपस्थित

त्याचा परिणाम म्हणून ब्रिटिश सरकारने सालाना ५ रुपये तजवीज करून ठेवली. पुढे ३० मे १८९५ रोजी लोकमान्य टिळकांनी पुण्याच्या हिराबागेत पुन्हा एकदा जंगी सभेचे आयोजन केले. श्रीमंत श्रीनिवासराव पंतप्रतिनिधींच्या अध्यक्षतेखाली सेनापती दाभाडे, लो. टिळक, बापूसाहेब कुरूंदवाडकर, सरदार पोतनीस, अनेक संस्थानिक, सरदार व पुण्यातील नामवंत व्यक्ती या सभेला उपस्थित होत्या. शिवस्मारकाच्या जीर्णोद्धारासाठी फंड उभा करण्याचं आवाहन या सभेला केलं गेलं.

Raigad
Shiv Rajyabhishek Din : रायगडावर शिवरायांची ४० किलो चांदीची मूर्ती

त्यासाठी एका मंडळाची स्थापना झाली. तेच हे ‘श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ’. लोकमान्य टिळक व त्यांच्या सहकाऱ्यांच्या उपस्थितीत दि.२४ व २५ एप्रिल १८९६ असे दोन दिवस रायगडावर शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.रायगडाचा ताबा ब्रिटिश सरकारकडे असल्याने मंडळाच्या वतीने शिवस्मारकाच्या जीर्णोद्धाराची परवानगी मागण्यात आली. पण ती ब्रिटिश सरकारने नाकारल्यामुळे सगळीकडे खळबळ माजली.

त्यावेळचे मंडळाचे अध्यक्ष श्री. दाजी आबाजी खरे यांनी १९०६मध्ये ब्रिटिश गव्हर्नर लॉर्ड लॅमिंग्टनकडे एक अर्ज दाखल केला. पुढे तब्बल १९ वर्षे संघर्ष केल्यावर लोकमान्य टिळकांच्या हयातीनंतर ‘रायगड स्मारक मंडळा’च्या पदाधिकाऱ्यांना यश आले व ६ फेब्रुवारी १९२५ला ब्रिटिश सरकारने मान्यता दिली. पुढील वर्षी १९२६मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीची जीर्णोद्धार झालेली वास्तू उभी राहिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.