Aditya Thackeray : बर्फात खेळण्यासाठी मुख्यमंत्री दावोसला; आदित्य ठाकरे

वर्षभर खोळंबलेल्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यासाठी मुख्यमंत्री दावोसला गेले होते
shiv sena aditya thackeray criticized cm eknath shinde davos visit politics
shiv sena aditya thackeray criticized cm eknath shinde davos visit politicsSakal
Updated on

Mumbai News : मुख्यमंत्र्यांना फक्त बर्फात खेळायचे होते म्हणून त्यांनी दावोस दौरा केला. वर्षभर खोळंबलेल्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यासाठी मुख्यमंत्री दावोसला गेले होते, अशी टीका युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली.

‘व्हायब्रंट गुजरात’सारख्या कार्यक्रमामध्ये २६ लाख कोटींची गुंतवणूक होते, तमिळनाडू बिझनेस समीटमध्ये साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक होते पण, वेदांता फॉक्सकॉनपेक्षा मोठा प्रकल्प अजून महाराष्ट्रात आलेला नाही, अशा शब्दांत त्यांनी सरकारवर टीकेचे आसूड ओढले.

मागील दौऱ्यामध्ये करार झालेल्या प्रकल्पांपैकी चंद्रपूर येथे न्यू एरा क्लिनटेक हा २० हजार कोटींचा प्रकल्प येणार होता. हॅथवे आणि आयसीपी कंपन्यांचीही साधारणपणे ३२ हजार कोटींची गुंतवणूक होती. फॉरेन डेटा सेंटर कंपनी ही १२ हजार कोटींची गुंतवणूक करणार होती.

मात्र, यात पुढे काहीही झालेले नाही. याबाबत काही वेगळी माहिती असेल तर उद्योगमंत्र्यांनी यापुढे येऊन सांगावे. तसेच कागदावर माहिती न देता कुठे काय काम उभे राहिलेय, याची छायाचित्रे दाखवावेत अशी मागणीही त्यांनी केली.

आदित्य ठाकरे म्हणाले...

  • जे उद्योगपती येथे भेटू शकले असते त्यांना मुख्यमंत्री दावोसला जाऊन भेटले.

  • दावोसच्या आर्थिक परिषदेत ते एकाही चर्चासत्रात सहभागी झाले नाहीत

  • दावोस येथे जुन्याच गुंतवणुकीवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.