शिवसेनेकडून पवारांच्या नेतृत्वाला शुभेच्छा

प्रशांत किशोर यांनी पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना अत्यंत विपरीत परिस्थितीत ऐतिहासिक विजय मिळवून दिला. त्या अगोदर बिहार निवडणुकीतही प्रशांत किशोर यांनी तेजस्वी यादव यांच्यासाठी काम केले होते.
Sharad Pawar - Uddhav Thackeray
Sharad Pawar - Uddhav Thackerayfile photo
Updated on
Summary

प्रशांत किशोर यांनी पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना अत्यंत विपरीत परिस्थितीत ऐतिहासिक विजय मिळवून दिला. त्या अगोदर बिहार निवडणुकीतही प्रशांत किशोर यांनी तेजस्वी यादव यांच्यासाठी काम केले होते.

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे प्रादेशिक पक्षांना एकत्र आणून त्यांची ‘यूपीए’अंतर्गत आघाडी उभारण्याचे प्रयत्न करणार असतील, तर शिवसेनेच्या त्यांना शुभेच्छा असतील, अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. पवारसाहेब देशाचे पंतप्रधान होणार असतील तर त्याचा आम्हाला आनंद आहे, असेही शिवसेनेचे दुसरे मुख्य प्रवक्ते अरविंद सावंत यांनी नमूद केले. निवडणूक नियोजनकार प्रशांत किशोर यांच्याशी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी (ता.११) सल्लामसलत केल्यानंतर शिवसेना नेत्यांनी ही भूमिका व्यक्त केली आहे. (Shiv Sena has congratulates Sharad Pawar for leading the UPA alliance)

काँग्रेसने मात्र सावध प्रतिक्रिया दिली आहे. ‘ही भेट व्यक्तीगत स्वरूपाची आहे, त्याचे तपशील त्यामुळे माहित नाहीत. अशा भेटीवर प्रतिक्रीया व्यक्त करणे योग्य नाही,’ असे कॉंग्रेस नेते सचिन सावंत म्हणाले. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फसलेल्या कोरोना नियोजनावर कॉंग्रेसने वारंवार शंका उपस्थित करत जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. देशाला पर्याय देण्याची ताकद कॉंग्रेसमध्येच आहे. त्यामुळे राजकारणाची पुढची दिशा कॉंग्रेस सर्व सहकारी पक्षांशी चर्चा करून निश्चित करेल, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

Sharad Pawar - Uddhav Thackeray
वादळा पुर्वीची शांतता! मराठा समाज आक्रमक होण्याच्या मार्गावर!

कामगिरी सुधारा : भाजप

राष्ट्रवादी कॉंग्रेसची कामगिरी लोकसभा निवडणुकीत फारशी सरस नव्हती, त्यामुळे ती कशी सुधारावी, असा सल्ला भाजप नेते अतुल भातखळकर यांनी दिला आहे. तीन पक्ष एकत्र होते आणि सहानुभूतीची लाट होती तरी पंढरपूरची पोटनिवडणूक का गमावली, याबद्दल प्रशांत किशोर यांचे मत पवारसाहेबांनी विचारले असेल, असेही ते म्हणाले.

पवारांची ‘पॉवरफुल’ रणनीती : प्रशांत किशोर यांच्यासोबत तब्बल तीन तास चर्चा

देशाच्या राजकारणात निवडणूक रणनीतीकार म्हणून नावाजलेले प्रशांत किशोर यांच्यासोबत शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तब्बल तीन तास चर्चा केली. यामुळे राज्याच्या राजकारणात नव्हे, तर देशाच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुका आणि भाजप विरोधात प्रादेशिक पक्षांची होणारी संभाव्य आघाडी यावर या बैठकीत चर्चा झाल्याचे कळते.

प्रशांत किशोर यांनी पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना अत्यंत विपरीत परिस्थितीत ऐतिहासिक विजय मिळवून दिला. त्या अगोदर बिहार निवडणुकीतही प्रशांत किशोर यांनी तेजस्वी यादव यांच्यासाठी काम केले होते. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांना प्रशांत किशोर यांच्या रणनीतीने दैदिप्यमान यश मिळाले होते. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान शिवसेनेसाठी प्रशांत किशोर यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. या पार्श्वभूमीवर आगामी लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेश, बिहार पश्‍चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, झारखंड आणि महाराष्ट्र या राज्यांतील प्रादेशिक पक्षांची भाजप विरोधी आघाडी होण्याचे संकेत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात शिवसेनेसोबत राष्ट्रवादी काँग्रेसची रणनीती ठरत असताना या सर्व प्रादेशिक पक्षांना घेऊन राष्ट्रीय स्तरावर शरद पवार किंवा ममता बॅनर्जी यांच्याकडे नेतृत्व जाण्याची चर्चा सुरू आहे.

Sharad Pawar - Uddhav Thackeray
दिल्लीत पंतप्रधानांची भेट घेतली म्हणजे शिवसेना नरमले नव्हे..!

या राजकीय घडामोडी पाहता प्रशांत किशोर या सर्व व्यवस्थापनाचा महत्त्वाचा दुवा ठरू शकतात. त्यामुळे शरद पवार यांनी आज प्रशांत किशोर यांच्याकडून देशभरातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला. कुठल्या पक्षांसोबत त्या त्या राज्यांमध्ये जनतेचा मूलभूत प्रश्नावर कसा कौल असेल यावरही सखोल चर्चा झाली. त्यामुळे प्रशांत किशोर आणि शरद पवार यांची भेट भाजप विरोधी राष्ट्रीय आघाडीची रणनीती ठरवण्यासाठी महत्त्वाची मानली जात आहे.

भाजपविरहित ब्रँडसाठी प्रयत्न

राजकीय ब्रँड आणि रणनीती ठरविण्यामध्ये प्रशांत किशोर हे हुकुमाचा एक्का समजले जातात. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांचा ब्रँड घराघरांत पोचविण्यात किशोर यांचे योगदान महत्त्वाचे होते त्यानंतर जगनमोहन रेड्डी, तेजस्वी यादव आणि आता ममता बॅनर्जी यांच्या निवडणुक रणनीतीचे व्यवस्थापन प्रशांत किशोर यांनी केले. त्यामुळे २०२४ च्या लोकसभा निवडणुकांसाठी भाजप विरहित राष्ट्रीय आघाडीचा ब्रँड ठरविण्याच्या रणनीतीचे सूत्र कसे असावे, यावर या बैठकीत चर्चा झाल्याचे सांगण्यात येते.

(Edited by : Ashish N. Kadam)

राज्यभरातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.