...तेच आज काँग्रेसचा गळा घोटतायेत; तिसऱ्या आघाडीवर सेना नाराज?

"आधी काँग्रेसकडून सुख, चैन प्राप्त केली, आता काँग्रेसचा गळा घोटता आहेत."
Third Front
Third FrontTeam eSakal
Updated on

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) या नुकत्याच मुंबई दौऱ्यावर होत्या. राष्ट्रीय राजकारणात सक्रीय झालेल्या ममता बॅनर्जींनी शरद पवार (Sharad Pawar), आदित्य ठाकरे, संजय राऊत या दोन पक्षाच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या. ममत बॅनर्जी यांनी यावेळी केलेल्या एका विधानाने काँग्रेस शिवाय तिसऱ्या आघाडीच्या (Third Front) मुद्दा पेटला. काँग्रेसने ममतांच्या या भूमीकेवर टीका केली. तर त्याचवेळी काहींना ही भूमिका आवडल्याचंही दिसलं. मात्र आता ‘सामना’ने (Saamana Editiorial) आपल्या अग्रलेखातून मांडलेल्या मतामुळे या चर्चेला एक वेगळ वळण मिळण्याची चिन्ह आहेत.

“दैवी अधिकारांचा घोळ!” या शीर्षकाखालील अग्रलेखात ममता बॅनर्जींसह प्रशांत किशोर यांच्या वक्तव्याचा देखील समाचार घेतला आहे. युपीए नेतृत्वाचा दैवी अधिकार कुणाला हे येणारा काळ ठरवेल असे म्हणत या अग्रलेखातून काँग्रेस शिवाय तिसऱ्या आघाडीच्या मुद्याला विरोध केल्याचं दिसून येतंय. दैवी अधिकार कुणाला हे वेळ ठरवेल पण सध्या भाजप विरोधात पर्याय तर उभा करा असं आवाहन सर्व विरोधीपक्षांना या माध्यमातून करण्यात आलंय.

Third Front
"विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक हिवाळी अधिवेशनातच"

काँग्रेस आज कठीण काळातून जात आहे, मात्र उताराला लागलेली गाडी वर चढूच द्यायची नाही हा प्रयत्न करणे चुकीचे असल्याचे मत या अग्रलेखात मांडण्यात आले आहे. तसेत काँग्रेसला घरचा आहेर देणाऱ्या जी-२३ नेत्यांचा समाचार घेताना, ज्या लोकांनी आयुष्यभर काँग्रेसकडून सुख, चैन, सत्ता उपभोगली तेच आता काँग्रेसचा गळा घोटता आहेत असा शाब्दिक हल्ला चढवण्यात आलाय.

Third Front
डॉ. आंबेडकर यांच्या ग्रंथ छपाईला गती द्या!

सामनातमध्ये नेमकं काय म्हटलंय?

"ममता बॅनर्जी यांच्या मुंबई भेटीनंतर विरोधी पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. निदान शब्दांचे हवाबाण तरी सुटत आहेत. भारतीय जनता पक्षासमोर समर्थ पर्याय उभा करायला हवा यावर एकमत आहेच, पण कोणी कोणाला बरोबर घ्यायचे किंवा वगळायचे यावर विरोधकांत अखंड खल सुरू आहे. विरोधकांतच ऐक्याचा किमान समान कार्यक्रम तयार होणार नसेल तर भाजपास समर्थ पर्याय देण्याच्या बाता कोणी करू नयेत. आपापली राज्ये व पडक्या, मोडक्या गढय़ा सांभाळीत बसावे की एकत्र यावे यावर तरी किमान एकमत होणे गरजेचे आहे. त्या ऐक्याचे नेतृत्व कोणी करावे तो पुढचा प्रश्न. ममता बॅनर्जी या प. बंगालात एखाद्या वाघिणीप्रमाणे झुंजल्या, लढल्या व जिंकल्या. बंगालच्या भूमीवर भाजपास चारीमुंडय़ा चीत करण्याचे काम त्यांनी चोख पार पाडले. त्यांच्या संघर्षास देशाने प्रणाम केलाच आहे. ममता यांनी मुंबईत येऊन राजकीय गाठीभेटी घेतल्या. ममतांचे राजकारण काँग्रेसधार्जिणे नाही. पश्चिम बंगालातून त्यांनी काँग्रेस, डावे व भाजपलाही संपवले हे सत्य असले तरी काँग्रेसला राष्ट्रीय राजकारणातून दूर ठेवून राजकारण करणे म्हणजे सध्याच्या ‘फॅसिस्ट’ राज्य प्रवृत्तीस बळ देण्यासारखेच आहे" अशी स्पष्ट भूमिका या अग्रलेखात मांडण्यात आली आहे.

सामनामध्ये पुढे असंही म्हटलं आहे की, "काँग्रेसचा सुपडा साफ व्हावा असे मोदी व त्यांच्या भाजपास वाटणे एकवेळ समजू शकतो. तो त्यांच्या कार्यक्रमाचाच भाग आहे, पण मोदी व त्यांच्या प्रवृत्तीविरुद्ध लढणाऱयांनाही काँग्रेस संपावी असे वाटणे हा सगळ्यात गंभीर धोका आहे. काँग्रेस पक्षाची गेल्या दहा वर्षांतील घसरण चिंताजनक आहे याबाबत दुमत नाही. तरीही उताराला लागलेली ही गाडी पुन्हा वर चढूच द्यायची नाही व काँग्रेसची जागा आपण घ्यायची हे मनसुबे घातक आहेत. काँग्रेसचे दुर्दैव असे की, ज्यांनी आयुष्यभर काँग्रेसकडून सुख चैन, सत्ता प्राप्त केली तेच लोक काँग्रेसचा गळा दाबत आहेत."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()