Shiv Sena: "तुम्हाला इंग्रजी वाचता लिहिता येतं का?"; शिंदे गटाच्या वकिलांनी सुनील प्रभूंना घेरलं!

शिवसेना आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर पार पडली.
Sunil Prabhu
Sunil Prabhu
Updated on

मुंबई : शिवसेनेच्या आमदार अपात्रतेप्रकरणाची सुनावणी आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर पार पडली. यावेळी शिंदे गटाकडून महेश जेठमलानी तर ठाकरे गटाकडून असिम सरोदे यांनी बाजू मांडली. यावेळी ठाकरे गटाकडून सुनील प्रभू यांनी इंग्रजीत याचिका दाखल केली. यावरुन शिंदे गटाच्या वकिलांनी घेरण्याचा प्रयत्न केला. (Shiv Sena Lawyers of Shinde group surrounded Sunil Prabhu on English petition What exactly happened)

Sunil Prabhu
Uttarkashi Tunnel Collapsed: "अडकलेले कामगार घरी परतणारच"; आंतरराष्ट्रीय टनेल एक्स्पर्टनं दिला विश्वास

नेमकं काय घडलं?

शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी सुनील प्रभू यांची उलटतपासणी घेतली. त्यांनी विचारलं...

जेठमलानी : प्रभू तुम्ही या अपात्रता याचिका इंग्रजीत दाखल केल्यात का?

प्रभू : मी याचिका मराठीत‌ दाखल केली आणि माझ्या वकिलांनी ती इंग्रजीत ड्राफ्ट करुन दिली.

जेठमलानी : तुम्ही याचिकांमध्ये कुठेही सांगितलं नाही की मला हे मराठीत समजलं आहे.

प्रभू : मी रेकॉर्डवर सर्व सांगितलं आहे.

जेठमलानी : याचिका ड्राफ्ट करताना ते आपल्याला मराठीत समजवण्यात आलं आहे असं कुठेही म्हटलेलं नाही, यावर प्रभू तुमचं मत काय आहे?

प्रभू : मला जेव्हा हे समजलं तेव्हाच मी सही केली असं म्हटलं आहे.

Sunil Prabhu
Anil Deshmukh: अनिल देशमुखांच्या अडचणी वाढल्या; मुलगी, सुनेवर आरोपपत्र दाखल!

जेठमलानी : प्रभू, तुम्हाला इंग्रजी वाचता लिहता येते का?

प्रभू : मला इंग्रजी कळतं, वाचता येतं, समजतं पण. पण मला माझ्या मातृभाषेत जास्त कळतं म्हणून मी तीच भाषा वापरतो.

जेठमलानी : तुमच्या वकिलांनी तुमची याचिका तुम्ही सही करण्यापूर्वी इंग्रजीत वाचून दाखवली का?

प्रभू : मला ती इंग्रजीत वाचून दाखवली. त्याचा शब्दशः मराठी अर्थ मी समजून घेतला त्यानंतरच मी सही केली.

जेठमलानी : तुम्हाला कोणत्या वकिलांनी अपात्रता याचिकेतील मुद्दे मराठीत समजवले.

प्रभू : अॅड. असिम सरोदे यांनी समजवलं.

Sunil Prabhu
Chhagan Bhujbal: "शरद पवारही मला स्क्रीप्ट देऊ शकत नाहीत, माझं स्क्रीप्ट..."; भुजबळांचं रोहित पवारांच्या आरोपांना उत्तर

ठाकरे गटाचा आक्षेप

या प्रश्नांच्या फैरींवर ठाकरे गटाच्या वकिलांनी आक्षेप घेतला. तसे म्हणाले असे प्रश्न विचारु नयेत. त्यावर जेठमलानी म्हणाले, तसं नाही चालणार, मी विचारणार.

Sunil Prabhu
Ashish Jadhav: कुख्यात गुंड आशिष जाधव येरवडा कारागृहातून फरार! पोलिसांना चकवा देऊन पळाल्यानं खळबळ

जेठमलानी : तुम्ही या व्यासपीठासमोर जे प्रतिज्ञापत्र इंग्रजी भाषेत सादर केलं आहे. १८ नोव्हेंबर २०२३ रोजी तुम्ही जे शपथपत्र सादर केलं, ते सुद्धा इंग्रजीत आहे हे सत्य आहे का?

प्रभू : हो खरं आहे. ते रेकॉर्डवर आहे.

जेठमलानी : शपथपत्रात आपण जी सही केलेली आहे, ती आपल्याला समजलेली नाही.

प्रभू : मी असं कसं करू शकतो. मी एक आमदार आहे. मला समजल्याशिवाय‌ मा सही करत नाही. मी अशिक्षित नाही. मला ३ लाख लोकांनी निवडून दिलेलं आहे. मी अशा कशा सह्या करू शकतो. मी समजून घेतल्याशिवाय सही करूच शकत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.