पत्रा चाळ कुठं आहे तेही माहित नाही; ED च्या चौकशीआधी राऊतांचं विधान

shiv sena leader sanjay raut ed inquiry in connection with the patra chawl land scam case rak94
shiv sena leader sanjay raut ed inquiry in connection with the patra chawl land scam case rak94
Updated on

मुंबई : महाराष्ट्रात सत्ता पालट झाल्यानंतर राजकीय गोधळ संपला आहे. यादरम्यान शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे आज मुंबईत ईडीसमोर हजर झाले. तत्पूर्वी, ईडी कार्यालयाबाहेर पत्रकारांशी बोलताना शिवसेना खासदार म्हणाले की, मला कोणत्याही प्रकारची भीती वाटत नाही कारण मी माझ्या आयुष्यात कधीही कोणतीही चूक केलेली नाही. (shiv sena leader sanjay raut ed inquiry in connection with the patra chawl land scam case)

संजय राऊतांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, हे राजकीय षडयंत्र असेल, तर त्याची माहिती नंतर मिळेल, असे ते म्हणाले. पत्रा चाळ जमीन घोटाळ्याबाबत बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, पत्रा चाळशी माझा काहीही संबंध नाही. ती चाळ कुठे आहे हे देखील माहित नाही. मी आजपर्यंत कोणतीही चूक केलेली नाही,

विशेष म्हणजे आज ईडीने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना दुसर्‍या दिवशी समन्स बजावले आहे. तत्पूर्वी, त्यांना 28 जून 2022 रोजीही समन्स बजावण्यात आले होते तेव्हा तो हजर राहू शकले नव्हते.

shiv sena leader sanjay raut ed inquiry in connection with the patra chawl land scam case rak94
फडणवीसांसाठी राज ठाकरेंचं ट्वीट; म्हणाले, ''तुम्ही तुमचं कर्तृत्व...''

प्रकरण नेमकं काय आहे?

पत्रा चाळमधील 672 कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी सोसायटी, म्हाडा आणि गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनी यांच्यात करार झाला होता असा ईडीचा दावा आहे. गुरु आशिष कंपनीचे एचडीआयएलचे राकेश वाधवान, सारंग वाधवान आणि प्रवीण राऊत हे संचालक होते. कंपनीवर महाडाची दिशाभूल केल्याचा आरोप आहे आणि त्यांनी तेथील एफएसआय इतर 9 बिल्डरांना आधी विकून 901 कोटी जमा केले. त्यानंतर मिडोज नावाचा नवीन प्रकल्प सुरू करून फ्लॅट बुकिंगच्या नावावर 138 कोटी रुपये गोळा केले, मात्र 672 मूळ भाडेकरूंना त्यांचे घर दिले नाही. अशा प्रकारे कंपनीने 1039.79 कोटी कमावले.

ईडीचा आरोप आहे की, एचडीआयएलने नंतर गुरु आशिष कंपनीचे संचालक प्रवीण राऊत यांना 100 कोटी रुपये दिले, त्यापैकी प्रवीण राऊत यांनी 55 लाख रुपये संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांना दिले, जे मनी लाँड्रिंगचा भाग आहेत. यापूर्वी ईडीने शिवसेना नेते संजय राऊत यांची अलिबाग जमीन आणि दादर फ्लॅट जप्त करण्याची नोटीस दिली आहे.

shiv sena leader sanjay raut ed inquiry in connection with the patra chawl land scam case rak94
राज्याच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.